Home /News /lifestyle /

Daily Horoscope : आठवड्याचा पहिला दिवस अ‍ॅक्शन-पॅक्ड असेल, त्या दृष्टीने तयारीत राहा

Daily Horoscope : आठवड्याचा पहिला दिवस अ‍ॅक्शन-पॅक्ड असेल, त्या दृष्टीने तयारीत राहा

जाणून घ्या कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस...

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आजचा दिवस अ‍ॅक्शन-पॅक्ड असेल. त्या दृष्टीने तयारीत राहा. तुमची ऊर्जेची पातळी वाढल्यासारखी वाटेल आणि तुम्हाला प्रयोग करण्याची इच्छा होईल. अतिरिक्त मानसिक ओझं घालवून द्या. LUCKY SIGN - A ruby crystal वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) खऱ्या भावना आता दडून राहणार नाहीत. तुम्ही त्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी शोधाल. तुम्ही तुमच्याभोवती जे काही गुडविल तयार केलं असेल, ते आता उपयुक्त वाटू लागेल. LUCKY SIGN - Silver ring मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्हाला कोलॅबोरेशनची काही ऑफर आली असली, तर त्यासाठी शिफारस केली जात आहे. सकाळ तणावाखाली गेल्यानंतर संध्याकाळ निवांत जाईल. नवी कल्पना आकार घ्यायला वेळ घेईल. LUCKY SIGN - A gift bag कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यामुळे भविष्यात कामाच्या अधिक संधी खुल्या होतील किंवा एखादी बिझनेस आयडियादेखील उदयाला येईल. एखादा संवाद अर्धवट राहिला असला, तर तो पूर्ण होईल याची काळजी घ्या. LUCKY SIGN - A pet सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्हाला एखादा चांगला शिक्षक किंवा इन्फ्लुएन्सर भेटेल आणि त्याचा प्रभाव तुमच्यावर पडेल. घरातल्या मुद्द्यांचा, विषयांचा प्रभाव तुमच्या मनावर दिवसभर राहील. टाइम मॅनेजमेंट हे एक आव्हान राहील. LUCKY SIGN - A garden कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) काही दिवस अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक असतात. आजचा दिवस अशा आव्हानात्मक दिवसांपैकी एक आहे, असं तुम्हाला वाटेल. आजच्या दिवसाची ऊर्जा काहीशी जड आहे; मात्र दुपारनंतर ही परिस्थिती सुधारेल. LUCKY SIGN - A fengshui sign तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल विनाकारण ताण घेऊ नये, अशी शिफारस केली जात आहे. महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्हाला अधिक माहितीची गरज भासेल. तुमच्या जोडीदाराचं मत विचारात घेण्यासारखं असेल. LUCKY SIGN - A milestone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती तुम्हाला लवकरच भेटण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तुमचं काम खूप वाढण्याची शक्यता आहे. काही दिवस तुम्हाला दैवी अनुभव आनंद देईल. LUCKY SIGN - A switchword धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आळशीपणा वेळीच घालवला नाही, तर त्रासदायक आणि नुकसानकारक ठरू शकतो. आज स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा. ऑफिसमध्ये तुमच्या हाताखालची व्यक्ती दिवसातला बराचसा वेळ खाईल. LUCKY SIGN - A bouquet मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आजच्या दिवसात उशीर होणं आणि कामं पुढे ढकलली जाणं असे अनुभव अनेक येतील. तुम्हाला महत्त्वाच्या काही कामांचं वेळापत्रक पुन्हा ठरवावं लागेल. नवे नियम पाळण्यासाठी आकर्षक वाटणार नाहीत. LUCKY SIGN - A white rose कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आजचा दिवस संथ वाटेल; मात्र दुपारनंतर तो वेग घेईल. एखादा नातेवाईक एखाद्या तातडीच्या गोष्टीसाठी सातत्याने फॉलो-अप घेईल. एखाद्या खास प्रसंगासाठी एखादं स्थळ बुक करण्याचं नियोजन करत असलात, तर आता त्यासाठी चांगला वेळ आहे. LUCKY SIGN - A glass tumbler मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नॉस्टॅल्जिया आणि एखादा जुना प्रसंग आठवल्यामुळे तुम्ही भावूक व्हाल. मित्रांसमवेत लवकरच रोड ट्रिप प्लॅन करण्याची इच्छा तुम्हाला होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अंतर्गत संवाद स्पष्ट ठेवा. LUCKY SIGN - Sign language
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या