Home /News /lifestyle /

Daily Horoscope: नक्की कसा असेल 22 मेचा तुमचा दिवस? जाणून घ्या 12 ही राशींचं भविष्य

Daily Horoscope: नक्की कसा असेल 22 मेचा तुमचा दिवस? जाणून घ्या 12 ही राशींचं भविष्य

या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या सभोवती तुम्हाला गोंधळात टाकणारी उर्जा असल्याने तुम्ही कृती करूनही योग्य फळ मिळणार नाही. एखाद्यावर प्रभाव पाडण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या योजाव्या लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी सांभाळून बोलावं. नवं काही शिकावंस वाटेल काही शिकलात तर कदाचित त्यातूनच व्यवसायाची संधी मिळेल. LUCKY SIGN - A technicolor photo वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमच्यापैकी जे इतरांच्या वर्चस्वाखाली होते ते आता स्वतंत्रपणे काम करण्याचा विचार करू लागतील. क्वचित भावनांवर ताबा राहणार नाही आणि काही व्यक्त कराल पण ते योग्यच असेल कारण समोरच्यालाही ती गोष्ट समजणं गरजेचं असेल. नोकरी शोधत असाल तर नव्या संधी मिळतील. नातं अधिक घट्ट होईल आणि ते कायमचं पक्कं करावं असंही वाटेल. LUCKY SIGN - A cardboard मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमचा छंद जोपासायचा असेल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे. अधिक विश्वासार्ह आणि काळाबरोबर तावून सुलाखून निघालेल्या एखाद्या तंत्राने तुमचं काम करण्याची संधी या काही दिवसांत तुम्हाला मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा जोडीदार एखादी गोष्ट सुचवेल जी खरोखरच फायद्याची ठरेल. LUCKY SIGN - A solo performance कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) मनात अनेक विचार येतील पण ते दिशाहीन असतील. इंडस्ट्रीतील एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रेमसंबंधांत असाल तर जोडीदाराकडून तुम्हाला काय हवंय ते व्यक्त करा. तुमच्या जोडीदाराच्या काही शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे. दोघांपैकी कुणाच्याही मनात भावना साचल्या असतील तर भांडणही होऊ शकतं. LUCKY SIGN - Antique article सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्या ऑफिसमधील मंडळी तुमच्या वागण्यातून तुमच्या मनातील गोष्टी ओळखू लागल्या आहेत. तुमचं मन स्वच्छ असलं तरीही तुमचे विचार मांडण्याची पद्धत मात्र बदलायला हवी. जर आता अधिकारपदावर असाल तर लवकरच तुम्ही समोरच्या बाजूला म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बाजूला जाणार आहात. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली व्यवसायाच्या गाडीला थोडी चालना मिळेल. फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील मंडळींना चांगला नफा मिळेल. LUCKY SIGN - A roller कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या नव्या योजनेत भूतकाळातली घटना खोडा घालेल. अगदी निकटच्या भविष्यातील काही प्लॅन्सबद्दल तुमच्या मनात स्पष्टता नसेल तर इतर कुणाची तरी मदत घ्या. तुम्ही तशी मदत घ्याल. आर्थिक प्रगतीमुळे गाडी रूळावर येईल. सहलीला जाण्याचा बेत करत असाल तर नक्की जाऊन या. LUCKY SIGN - A honeybee तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचं कौशल्य स्वीकारलं जाईल आणि त्याचं कौतुकही होईल असं तरी होईल नाहीतर एकदम संथ चाललेलं रूटिन एकाएकी काही आठवड्यांत कष्टप्रद रूटिनमध्ये रुपांतरित होईल. तुम्ही तुमच्या आवडीचं काम शोधत आहात, जवळचंच कुणीतरी एखादा लीड सुचवेल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतील. LUCKY SIGN - A red flower वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) उशिरा का होईना पण भूतकाळातील काही निर्णयांची सकारात्मक फळं मिळाल्याचं तुम्ही मान्य कराल. कधीतरी नशीब आपल्याला विशिष्ट दिशेने घेऊन जातं. तुम्हाला तुमच्या निवडीबाबात खात्री होती आणि आता इतरही ते मान्य करत आहेत. ऑफिसमध्ये थोड्या कुरबुरी होतील. मनातले दैत्यच तुम्हाला नेहमी विचलित करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सरळरेषेत पुढे जाण्याची ही वेळ आहे. LUCKY SIGN - Your favorite dessert धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या नात्यात तुम्ही भूतकाळात केलेली चांगल्या गोष्टी आता संकटकाळात तुमची सुटका करायला मदतीला येत आहेत. कामाचा व्याप प्रचंड पण उकरण्याजोगा असेल. अनेक डेडलाईन पाळताना दमछाक होईल. खटल्यासंबंधी कागदपत्रं जपून ठेवा. जवळचीच व्यक्ती त्या कागदपत्रांबाबातची माहिती बाहेर फोडू शकते. LUCKY SIGN - A sage plant मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) नियोजन केलेल्या गोष्टी कृतीत आणायला चांगला काळ आहे. एखादी बिझनेस आयडिया चांगले रिझल्ट देईल. भागीदारी केलीत तर तुमच्या चिंता बऱ्याचअंशी कमी होतील आणि तुमच्या कष्टांना पाठिंबा मिळेल. लग्नासाठी ओळखीतून आलेल्या स्थळाशी लग्न ठरू शकतं. मनातील विचारांत स्पष्टता येईल. मित्रांना भेटणं हिताचं ठरेल. LUCKY SIGN - Blueberries कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही करत असलेल्या नियोजनात अडथळे येत असावेत, पण सध्याचा काळ प्रगतीसाठी चांगला आहे. शिक्षणासाठी एखादी ग्रँट मिळू शकेल. घरापासून दूर रहात असाल तर घरच्यांची प्रचंड आठवण येईल पण ती क्षणिकच असेल. नियमित व्यायाम कराल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला राग येईल आणि तिचा तिटकारा वाटेल. LUCKY SIGN - A yellow clay pot मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या कौटुंबिक मित्राकडून एखाद्या कामाच्या संधीबद्दल माहिती मिळेल. दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित केलंत तर अपेक्षित परिणाम मिळतील. सध्या विचलित करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. तुमच्याबद्दल पूर्वग्रह असलेली समाजातली मंडळी काही बोलून तुमचं मनस्वास्थ्य बिघडवू शकतात. एखादी छोटी सहल आनंद देईल. परगावी गेलात तर तुम्हाला कदाचित नवा दृष्टिकोन मिळेल. LUCKY SIGN - A silk cloth
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या