Home /News /lifestyle /

Daily Horoscope : कसा असेल 13 जूनचा दिवस? जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Daily Horoscope : कसा असेल 13 जूनचा दिवस? जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस...

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 13 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आयुष्यातल्या वेगामुळे तुम्हाला स्वतःला हरवल्याची भावना निर्माण झाली असेल, तर थोडा वेग कमी करण्याची गरज आहे. तुमच्या कामामध्ये एखाद्या व्यक्तीने अचानक स्वारस्य दाखवण्याची अनेक कारणं असू शकतात. कमाईसाठी एखादा दुसरा स्रोतही विचारात घ्या. LUCKY SIGN – A Constellation वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या विषयात तुमची रुची असण्याचं कारण तुम्हाला वाटतं त्यापेक्षा वेगळं असू शकतं. त्रासदायक स्वप्नं पडू शकतात; मात्र त्यांबाबत विचार टाळणं शक्य होणार नाही. एखादी सवय सोडण्याचा प्रयत्न करत असाल, तर यश मिळेल. LUCKY SIGN – A Hat मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) कोणी तरी अगदी बारीकपणे तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, हे तुम्हालाही जाणवेल; मात्र तुमच्या हुशारीने तुम्ही त्या व्यक्तीला चकवा द्याल. तुमच्या खासगी गोष्टींबाबत कामाच्या ठिकाणी चर्चा करणं टाळा. LUCKY SIGN – Lukewarm water कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमचा एखादा प्लॅन खरंच योग्य असता, तर आतापर्यंत त्याचे परिणाम दिसले असते. आता तुमची स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ आली आहे. एखादी नवी संकल्पना वरिष्ठांना आवडेल. वैयक्तिक आयुष्यात थोडासा चढउतार जाणवेल; मात्र तो तात्पुरता असेल. LUCKY SIGN – A New Shoe सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) भूतकाळातली एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येईल; मात्र तुम्ही तिला भाव देणार नाही. तुम्ही कामात व्यग्र असाल; मात्र एकाकी असल्याची भावनाही मनात येईल. एखाद्या लहान मुलाची करामत पाहून आनंदी व्हाल. LUCKY SIGN – A Dimond ring कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामाच्या नव्या ठिकाणामुळे थोडा विरंगुळा होईल. ऑफिसमधली एखादी व्यक्ती सातत्याने तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. एखादा साधा दृष्टिकोन मोठा प्रभाव पाडू शकतो. LUCKY SIGN – An Eclipse तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादा जुना फोटो किंवा आठवणीमुळे दबलेली भावना बाहेर येईल. घरातल्या एखाद्या व्यक्तीला दुर्लक्षित वाटू शकतं. तुमच्या संकल्पना नेहमीच विशेष असतात. आज त्या सादर करण्याची संधी मिळेल. स्वतःहून संवाद सुरू करण्यावर भर द्या. LUCKY SIGN – A Headphone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला लवकरच आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. तुम्ही आधीच ठरवलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये आता बदल करावासा वाटणार नाही. विदेशात जाऊन आल्यानंतर एखाद्या गोष्टीबाबत सुस्पष्टता येईल. तुमचा दिनक्रम चुकवू नका. LUCKY SIGN – A Terracotta basin धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) डेडलाइन जवळ आली आहे आणि भरपूर काम शिल्लक आहे असं होईल. त्यामुळे तुमचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. घरगुती गोष्टींबाबत एखादा आशेचा किरण दिसून येईल. तुमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी एखाद्या तुमच्यापेक्षा तरुण व्यक्तीची कामाची पद्धत प्रेरणादायी ठरेल. LUCKY SIGN – A Silicon tray मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटूनही, ती व्यक्ती तुमच्याशी सौहार्दपूर्ण राहू शकते. अशा व्यक्तींवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. नव्यानेच जोपासलेल्या एखाद्या सवयीचे फायदे आता दिसू लागतील. तुम्हाला तुमचा आडमुठेपणा सोडून अधिक लवचिक होण्याची गरज आहे. LUCKY SIGN – A Candle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) कायदेशीर बाबींमध्ये काहीसा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे ज्युनियर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करतील. एखाद्या मोठ्या निर्णयाची घोषणा करणार असाल, तर सध्या ती पुढे ढकला. मेडिटेशन केल्यास फायदा होईल. LUCKY SIGN – A Candy मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) सभोवताली घडणाऱ्या काही गोष्टींमधला ठरावीक पॅटर्न तुमचं लक्ष वेधून घेईल. तुमचं ध्येय अगदी जवळ आलं आहे असं वाटेल; मात्र त्यासाठी अद्याप वेळ आहे. आपलं लक्ष नसतानाच एखादी संधी दारावर ठोठावते, असा काहीसा अनुभव येईल. LUCKY SIGN – A Yellow crystal
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या