मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्हीही रोज 7 ते 8 तासांची झोप घेता ना? नाहीतर या गंभीर आजाराचा करावा लागेल सामना

तुम्हीही रोज 7 ते 8 तासांची झोप घेता ना? नाहीतर या गंभीर आजाराचा करावा लागेल सामना

दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातच आता एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, पाच तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत या गंभीर आजाराचा धोका हा तब्बल 74 टक्के अधिक असू शकतो.

दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातच आता एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, पाच तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत या गंभीर आजाराचा धोका हा तब्बल 74 टक्के अधिक असू शकतो.

दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातच आता एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, पाच तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत या गंभीर आजाराचा धोका हा तब्बल 74 टक्के अधिक असू शकतो.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 18 मार्च : निरोगी आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणं अतिशय आवश्यक आहे. दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातच आता एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, पाच तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याचा धोका हा तब्बल 74 टक्के अधिक असू शकतो. ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

    जागतिक स्तरावर 200 दशलक्षाहून अधिक जणांना पेरिफेरल आर्टरी डिसीज (पॅड) हा विकार आहे. यामध्ये पायांमधल्या धमन्यांमधल्या रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात धक्कादायक खुलासा झालाय. पाच तासांपेक्षा कमी झोपं घेणाऱ्यांना पॅड होण्याचा धोका अधिक असतो, असं या अभ्यासातून समोर आलंय. याबाबत स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे अभ्यासक शुई युआन म्हणाले, ‘आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की रात्री सात ते आठ तास झोपणं ही 'पॅड'चा धोका कमी करण्यासाठी चांगली सवय आहे. पुरेशी झोप घेतल्यामुळे व्यक्ती शारीरिकरीत्या सक्रिय राहते. तसंच पॅड होण्याचा धोका कमी होतो. पॅड असलेल्या रुग्णांनी वेदनांचं व्यवस्थापन केल्यास रात्रीची पुरेशी झोप मिळू शकते.’

    दिवसा झोपण्याबद्दलचं निरीक्षणही या अभ्यासात नोंदवलं आहे. दिवसा झोपणाऱ्यांना पॅडचा धोका 32 टक्के जास्त असतो, असं या अभ्यासातून दिसून आलंय. याबाबत युआन म्हणाले, ‘रात्रीची दीर्घ झोप, दिवसा झोपणं आणि पॅड यांमधल्या संबंधांवर अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे.’

    युरोपियन हार्ट जर्नल-ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात पॅडच्या जोखमीसह झोपेचा कालावधी आणि दिवसा डुलकी घेण्याच्या संबंधांचं विश्लेषण करण्यासाठी 6,50,000हून अधिक जणांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 53,416 प्रौढांच्या निरीक्षणात्मक विश्लेषणामध्ये, सात ते आठ तासांच्या तुलनेत रात्री पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास पॅडचा धोका जवळपास दुप्पट होतो, असा निष्कर्ष आला. 1,56,582 आणि 4,52,028 व्यक्तींच्या विश्लेषणाद्वारे असं दिसून आलं की, कमी झोपेचा पॅडच्या वाढत्या जोखमीशी संबंध होता.

    दीर्घ झोपेबाबत 53,416 प्रौढांच्या निरीक्षणात्मक विश्लेषणात असं दिसून आलं की, सात ते आठ तासांच्या तुलनेत रात्री आठ तास किंवा त्याहून अधिक झोप घेतल्यास पॅडचा धोका 24 टक्के जास्त असतो. हा शोध 1,56,582 आणि 4,52,028 व्यक्तींच्या विश्लेषणावर आधारित आहे. याबाबत युआन म्हणाले की, ‘या अभ्यासातून स्पष्ट होतं की, रात्रीच्या वेळची कमी झोप पॅड विकसित होण्याची शक्यता वाढवू शकते आणि अपुरी झोप घेतल्यानं पॅडचा धोका वाढतो.’

    निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करण्यासोबतच रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. वेळेत झोपणं व सकाळी लवकर उठण्याची सवय शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

    First published: