मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यात आळस झटका आणि सायकलिंग करा, तुमचा होईल प्रचंड फायदा!

हिवाळ्यात आळस झटका आणि सायकलिंग करा, तुमचा होईल प्रचंड फायदा!

सायकलिंग हा हिवाळ्यातील सोपा आणि प्रचंड फायदा देणारा व्यायाम आहे. हिवाळ्यात सायकलिंग करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सायकलिंग हा हिवाळ्यातील सोपा आणि प्रचंड फायदा देणारा व्यायाम आहे. हिवाळ्यात सायकलिंग करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सायकलिंग हा हिवाळ्यातील सोपा आणि प्रचंड फायदा देणारा व्यायाम आहे. हिवाळ्यात सायकलिंग करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर : दिवाळी संपताच मुंबईतील तापमानात घट होऊ लागली आहे. रोज सकाळी पडणाऱ्या थंडीमध्ये आळस झटकून फिरायला जाणं, व्यायाम करणं हे अनेकांच्या जीवावर येतं. पण, तब्येत सदृढ ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती मनापासून पटलेले मुंबईकर या थंडीत मॉर्निंग वॉक, रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. मुंबईतील बागा, जॉगर्स पार्क या ठिकाणी गर्दी आता वाढू लागलीय. त्याचबरोबर शहरातल्या फिरण्याच्या वेगवेगळ्या भागात गेलो तर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी सायकलिंग करताना दिसतात.

कडाक्याची थंडी सुरु झाली की पौष्टिक,उष्ण आणि भरीव आहारावर भर दिला जातो मग तो पचवायचा असेल तर तितकाच कठोर व्यायामही करावा लागतो. म्हणून सायकलिंग हा उत्तम पार्यय असल्याचं मानलं जातं.

सायकलिंगचे फायदे

सायकलिंगमुळे स्नायूला योग्य ताण मिळतो आणि ते मजबूत होतात. शरीर सुदृढ राहते, मानसिक आरोग्य चांगले राहते, वजन कमी करण्यासाठीही सायकलिंग उपयोगी आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या निसर्गात, शुद्ध हवेत सायकलिंग केलं तर सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी सुद्धा मदत होते.

सायकल प्रेमींचे ग्रुप्स

सायकलिंग करता करता सायकलप्रेमींचे ग्रुप्स सुद्धा बनू लागले आहेत आणि हेच ग्रुप्स सकाळी अगदी आनंदाने, उत्साहाने सायकलिंग करताना दिसतात. त्यामुळे मित्र मैत्रिणींमधले नाते संबंधही दृढ होतात आणि सायकलिंगची ऊर्जाही मिळते.

सायकलिंग हिवाळ्यातच का?

हिवाळ्यात वातावरणात गारठा असतो त्यामुळे सहसा तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता सुद्धा भासू लागते.  सायकलिंग केल्यानं घामावाटे शरीरातलं पाणी निघून जातं आणि नंतर पाणी  प्यायलं सुद्धा जातं. हिवाळ्यात थंड वातावरणात सायकलिंग केल्याने थकवा जाणवत नाही. त्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेत सायकलिंगसाठी हिवाळा उत्तम मानला जातो

Video : थंडीमध्ये घरीच करा 'हे' सोपे व्यायाम, तुम्ही रहाल एकदम फिट!

हिवाळ्यात सायकलिंग करत असाल तर आहार काय घ्यावा?

सायकलिंग करत असताना मेहनत लागते. त्यामुळे दूध व दुधाचे पदार्थ,डाळी, कडधान्ये,अंडी. मांसाहार, तृणधान्ये,तेलबिया, यांचा समावेश करावा. हिवाळ्यात वातावरण कोरडे असते. सायकलिंग किंवा इतर व्यायाम केल्यावर घाम येतो म्हणून भरपूर पाणी प्यावे व क्षारयुक्त पेय घ्यावे भाज्यांचा आणि फळांचा आहारात समावेश असावा.

गुलाबी थंडीत आले विदेशी पाहुणे, पाहा आकर्षक फोटो

'सायकलिंग हा सोपा व्यायाम असून कोणत्याही वयोगटातील लोकं सायकलिंग करू शकतात. सायकलिंगमुळे शरीर फिट राहते तसेच शरीरात ऊब निर्माण होते अन शरीर लवकर थकत नाही त्यामुळे रोज सायकलिंग करणं आवश्यक आहे,' असं सायकल प्रेमी अक्षय हांडे यांनी सांगितलं

First published:

Tags: Health Tips, Local18, Mumbai, Winter