मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'मीटिंगसाठी VIDEO सुरू केला, तर बॉसने पँटच घातली नव्हती' Covid काळात सुरू आहेत Online छळवणुकीचे भीषण प्रकार

'मीटिंगसाठी VIDEO सुरू केला, तर बॉसने पँटच घातली नव्हती' Covid काळात सुरू आहेत Online छळवणुकीचे भीषण प्रकार

नेहमीप्रमाणे ही एक बिझनेस मीटिंग असेल असं अनिताला वाटलं होतं. मात्र, बॉसच्या बाजूचा कॅमेरा सुरू होताच तिला धक्का बसला.

नेहमीप्रमाणे ही एक बिझनेस मीटिंग असेल असं अनिताला वाटलं होतं. मात्र, बॉसच्या बाजूचा कॅमेरा सुरू होताच तिला धक्का बसला.

नेहमीप्रमाणे ही एक बिझनेस मीटिंग असेल असं अनिताला वाटलं होतं. मात्र, बॉसच्या बाजूचा कॅमेरा सुरू होताच तिला धक्का बसला.

    राखी बोस नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : अनिता (नाव बदललं आहे) ही 38 वर्षांची प्रोफेशनल आहे आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. अर्थातच Covid-19 च्या परिस्थितीमुळे ती गेले काही महिने घरूनच काम करते आहे. अनिता दोन मुलाचीं आई आहे. एकदा ऑफिसची वेळ संपल्यानंतर जेवायची तयारी करत अचानक तिच्या बॉसचा फोन आला. झूमवर एका ऑनलाइन मीटिंगसाठी त्यानं लॉगइन करायला सांगितलं. अनिता कधीच काम टाळणारी नव्हती त्यामुळे कामाची वेळ उलटून गेलेली असली तरी तिने घरातलं काम बाजूला ठेवून लगेच कपडे व्यवस्थित करत झूम कॉल सुरू केला. नेहमीप्रमाणे ही एक बिझनेस मीटिंग असेल असं अनिताला वाटलं होतं. मात्र, बॉसच्या बाजूचा कॅमेरा सुरू होताच तिला धक्का बसला. एक तर दोघांचीच ती मीटिंग होती आणि तिचा बॉस शर्ट-पँट न घालताच समोर बसलेला दिसला. कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली विचित्र दिसत होत्या. अशा स्थितीत तिला अत्यंत अवघडल्यासारखं झालं. बॉस त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी खाजवत होता. मीटिंग संपेपर्यंत तिला या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास झाला. पण याबाबत कुठे आणि कशी तक्रार करावी याची कसलीही कल्पना तिला नव्हती. कारण तिच्या बॉसने थेट तिच्याशी काही आक्षेपार्ह संवाद केलेला नव्हता. काही अश्लील तो बोललेला नव्हता. तरीही असल्या अवस्थेत VIDEO मध्ये त्याला पाहून काम करणं म्हणजे अनिताला स्वतःची अत्यंत कुचंबणा होतेय असं वाटलं. असे अनुभव येणारी अनिता एकटी नाही. यापेक्षा भयंकर अनुभव सध्या अनेक जणांना येत आहेत. ऑनलाईन छळवणुकीचे प्रकार कोरोना काळात वाढले आहेत. याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो आहे. त्यांची मानसिक कुचंबणा होते आहे आणि याविषयी कुठे तक्रार करावी, कुणाला सांगावं हेच त्यांना कळत नाही. कोरोनाच्या काळातील बाहेरील जग ठप्प झाल्यानं सर्व काही ऑनलाइन सुरू झाले आहे. या ऑनालाइन संवादांनी महिलांच्या ऑनलाइन छळ, गैरवर्तणूक अशा घटनांमध्ये वाढ झाली असून परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे सायबर तज्ज्ञ आकंचा श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. तशीच काहीशी ही अनिताची कोलकाता येथील घटना आहे. अनिताच्या ऑफिसमध्ये महिलांच्या छळवणुकीविरोधात तक्रार करण्यासाठी POSH अंतर्गत समिती आहे. पण मुळात तिच्या बॉसचं वर्तन छळवणूक सदरात मोडतं का, नेमकी काय आणि कशी करायची तक्रार याबद्दल अनिताच्या मनात गोंधळ आहे. लॉकडाउनमध्ये  शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं बंद असल्याने झूम बैठक आणि ऑनलाइन वर्ग यासारखे आभासी संवाद वाढू लागले आहेत. आभासी संवादात वाढ झाल्याने नवीन प्रकारची समस्या निर्माण झाली आहे. यात गुंडगिरी, महिलांचा ऑनलाईन छळ वाढला आहे. मार्चमध्ये आलेल्या एका अहवालानुसार महिला आणि किशोरवयीन मुलांना धमकावणं आणि ऑनलाइन छळांच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत  36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण ही संख्या अर्धवट असून परिस्थिती यापेक्षा बिकट असल्याचं श्रीवास्तव यांचं  म्हणणं आहे. त्या एक फर्म चालवतात. झूम मीटिंगच्या माध्यमातून लैंगिक छळाचे हे नवीन प्रकार आता समोर येत आहेत. इंटरनेट साक्षरता आणि जनजागृतीसाठी श्रीवास्तव यांचे एक फाउंडेशन आहे. तसेच पीडितांना सहकार्य करणं त्यांचं मनोबल वाढवणं असंही कार्य तिथे केलं जातं. पोलिसांसोबतच त्यांची हेल्पलाईन ना नफा ना तोटा या तत्त्वावर सायबर सुरक्षेविषयी माहिती देण्यासाठी कार्यरत आहे. शिवाय मदतही पुरवते. त्यांच्या हेल्पलाइनवर येणार्‍या तक्रारींत 200 नी वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन छळांची ही प्रकरणं अधिकच बिकट होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. केवळ ऑनलाईन मीटिंग नव्हे तर ऑनलाईन गेमिंगमध्येही सहकारी पुरुषांकडून थेट अत्याचाराच्या धमक्या आल्याचं जाहिरात व्यावसायिक विनिता गुप्ता यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 ला गुप्ता म्हणाल्या, 'एक मुलगी जेव्हा गेम खेळताना दिसते तेव्हा समोरची व्यक्ति थेट  'रेट'ची  विचारणा करतो. आणि याला जेव्हा आपण नकार देतो तेव्हा थेट बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात. यासह मुलांना शिवीगाळ त्यांना धमकावणं, विनापरवानगी कोणाचेही छायाचित्र अपलोड करणं, अफवा पसरविणं असे प्रकार याद्वारे होत असतात. असले प्रकार मुलांच्या व महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, अनेकांना याबाबत कुठे तक्रार करावी याची माहिती नसते अनेकांना तर हा आपला लैंगिक छळ आहे हेच समजत नाही. सध्या इंटरनेटचा वापर वाढल्याने असे प्रकार वाढले आहेत, असे श्रीवास्तव सांगतात. दी लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या यूके मिलेनियम कोहोर्ट अभ्यासानुसार, अशा धमक्यांच्या परिणामाने मानसिक आरोग्य व नैराश्याचा सामना करावा लागतो. यात व्यक्ती स्वतःची शारीरिक हानी करू शकते. याबाबत महत्त्वाचं म्हणजे जागृती वाढवणे हाच यावरील मोठा उपाय असल्याचं श्रीवास्तव सांगतात. सायबर सुरक्षा यात सरकारने अधिक गुंतवणूक केल्यास हे शक्य होईल. .
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cyber crime, Sexual harrasment

    पुढील बातम्या