Home /News /lifestyle /

केस उगवले नाहीत म्हणून ग्राहकानं अभिनेत्याकडे मागितले 5 लाख; काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा

केस उगवले नाहीत म्हणून ग्राहकानं अभिनेत्याकडे मागितले 5 लाख; काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा

(Photo Courtesy: AFP Relaxnews/ maga/shutterstock.com)

(Photo Courtesy: AFP Relaxnews/ maga/shutterstock.com)

जाहिरात पाहून हेअर प्रोडक्ट (hair product) खरेदी करणाऱ्या एका ग्राहकानं त्याचा परिणाम झाला नाही म्हणून त्या प्रोडक्टची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याकडेच भरपाई मागितली आहे.

    थ्रिसुर, 05 जानेवारी : आपल्यापैकी बहुतेक जण जाहिरात (advertisement) पाहून प्रोडक्ट खरेदी करतात. जाहिरातीतील चमकदार, लांबलचक केस, तुळतुळीत आणि गोरागोमटा चेहरा याची भुरळ पडते. आपणही असं दिसावं म्हणून ग्राहक ते प्रोडक्ट खरेदी करतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचा परिणाम वेगळाच होता किंवा होतच नाही. जाहिरात पाहून असं हेअर प्रोडक्ट (hair product) खरेदी कऱणाऱ्या एका ग्राहकानं त्याचा परिणाम झाला नाही म्हणून  त्या प्रोडक्टची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याकडेच भरपाई मागितली आहे. केरळच्या कन्झ्युमर कोर्टनं हेअर क्रीम प्रोडक्ट  (Hair Cream Product) च्या जाहिरातीत चुकीचा दावा करणाऱ्या फिल्म अभिनेत्याला जबाबदार ठरवलं आहे. अभिनेत्यानं प्रोडक्टबाबत माहिती करून न घेताच जाहिरात केली. थ्रिसूरच्या जिल्हा ग्राहक फोरमनं धात्री हेअर क्रिम (Dhathri Hair cream) तयार करणाऱ्या कंपनी आणि या कंपनीची जाहिरात करणारा अभिनेता अनुप मेननला (Anoop Menon)   दंड ठोठावला आहे. हे वाचा - नावडत्या कामाचे तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होतातयंत का? ही लक्षणं वेळीच ओळखा फ्रान्सिस वडक्कन नावाच्या व्यक्तीनं ए-वन मेडिकल्स, धात्री आयुर्वेद प्राइव्हेट लिमिटेड आणि अनुप मेननं यांच्याविरोधात तक्रार केली होती. वडक्कन यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2012 साली 376 रुपयांमध्ये ही हेअर क्रीम खरेदी केली होती. हेअर क्रीममुळे केस उगवतात अशी जाहिरात पाहिल्यानंतर ही क्रीम खरेदी केली होती. हे प्रोडक्ट सहा आठवडे वापरल्यानंतर हेअर ग्रोथ होईल असा दावा अनुप मेनननं जाहिरातीत केलं. पण क्रीमचा वापर केल्यानंतर काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर वडक्कन यांनी फोरमकडे धाव घेतली आणि तक्रार केली. त्यांनी 5 लाख रुपयांची भरपाई मागितली. लाइव्हलॉच्या रिपोर्टनुसार अनुप मेनननं आपण या प्रोडक्टचा वापर केला नसल्याची कबुली दिली. ते फक्त आपल्या आईनं तयार केलेल्या हेअर ऑईलचाच वापर करतात. जाहिरातीत काय सांगितलं जातं आहे, याची मला माहिती नाही कारण ही मॅन्युफॅक्चर स्टोरी होती. हे हेअर ग्रोथ प्रोडक्ट नाही तर हेअर केअर प्रोडक्ट आहे, असं वाटल्याचं तो म्हणाला. हे वाचा - आता शशी थरुर यांच्यावर बरसली कंगना; म्हणाली, 'गृहिणींना पगाराची गरज नाही..' याचा अर्थ प्रोडक्टची जाहिरात करणाऱ्यानं प्रोडक्टचा वापर केला नाही. जाहिरातीत देण्यात आलेली आश्वासनं आणि त्याचा वापर केल्यानंतर मिळणारा रिझल्ट यात तफावत आहे. तसंच या प्रोडक्टमध्ये जी नोट देण्यात आली आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनाही नीट दिसत नाही आहेत. कोर्टानं सांगितलं, की तक्रारीत आयुर्वेदिक औषधांच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. पण प्रोडक्ट वापरल्यानंतर जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यानुसार रिझल्ड मिळाला नाही. त्यामुळे संंबधित कंपनी आणि अभिनेत्याला 10-10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या