Home /News /lifestyle /

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज खा दही-भात; सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

दह्यात कॅल्शिअम, व्हिटॅमीन बी-12 असतंच शिवाय यातील गुड बॅक्टेरीया आरोग्यासाठी चांगले असतात.

दह्यात कॅल्शिअम, व्हिटॅमीन बी-12 असतंच शिवाय यातील गुड बॅक्टेरीया आरोग्यासाठी चांगले असतात.

सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी इन्टस्टाग्रामवर रील्सवर (Instagram Reels) एक आयडिया शेअर केली आहे. पाहा

  मुंबई, 26 मे: उन्हाळ्याच्या (Summer health tips) दिवासात आपल्यला सगळ्यांनाच भूक कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. जास्त गर्मीमुळे पाणी (Water) पिण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवण (Food) कमी केल्याने पोषणही कमी मिळतं. त्यामुळे दिवसभर थकला आल्यासारखं वाटायला लागतं. सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity Nutritionist Rujuta Divekar) नेहमीच त्यांच्या फॉलअर्सला आहार (Diet) आणि व्यायामा (Exercise)बद्दल सल्ले देत असतात. यावेळी त्यांनी उन्हाळ्यातला आहार कसा असावा यासंर्भात इन्टस्टाग्रामवर रील्सवर (Instagram Reels) एक आयडिया शेअर केली आहे. त्यात त्यांनी दही-भात खाण्याचा सल्ला दिला आहे. दही-भात खाण्याने अनेक फायदे दुपारच्या जेवणात दही-भात (Curd Rice) आणि मीठ एकत्र करुन खावं. हे एक प्रो बायोटिक परफेक्ट कॉम्बिनेशन (Pro Biotic Perfect Combination) आहे. यामुळे आपल्याला पोषण तर, मिळतंच शिवाय एनर्जी लेव्हलही वाढते. यासाठी घरी बनवलेलं दही खाणं जास्त चांगलं. दह्यात कॅल्शिअम, व्हिटॅमीन बी-12 असतंच शिवाय यातील गुड बॅक्टेरीया आरोग्यासाठी चांगले असतात.
  सैंधव मीठ खाण्याचे फायदे दही-भातामध्ये मीठ घालताना सैंधव मीठ घातल्यास जास्त फायदा मिळतो. सैंधव मीठामध्ये नेहमीच्या वापरातल्या साध्या मीठापेक्षा जास्त गुण असतात. यामुळे पचन सुधारतं, त्वचादेखील चांगली होते. रोग प्रतिकाशक्ती वाढेल दही-भात खाण्याने रोग प्रतिकारशक्ती सुधारते. दही ऍन्टी ऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे केवळ आपलं शरीरच मजबूत राहत नाही तर, संसर्गाविरूद्ध लढण्याची देखील चांगली क्षमताही वाढते. हिमोग्लोबिनच प्रमाण वाढतं रक्तवाढीसाठी फॉलेटचं सेवन वाढवायला सांगितलं जातं,त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमी दूर होऊ शकते. फॉलेट हा व्हिटॅमीन-बीचा एक प्रकार आहे. ज्या व्यक्तीच्या शरीरात योग्य प्रमाणात फॉलेट नसेल तर, रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत. त्यामुळे ऍनिमीया सारखा त्रास होऊ शकतो. तांदळातही फॉलेट मोठ्या प्रमाणात असतं. चांगली झोप अन्हाळ्यात अनेकांना झोप न येण्याचाही त्रास असतो. त्यामुळे चांगली झोप घेण्यासाठी दही-भात खा. तांदळात ट्रायटोफॅन असतं जे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं. सेरोटोनिनच्या निर्मितीमुळे चांगली झोप येते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health Tips, Superfood

  पुढील बातम्या