रणरणत्या उन्हात दही खाल्ल्यानं होतात 'हे' फायदे

जेवणात सर्वसाधारणपणे दही असतंच. तुमच्या जेवणात तुम्ही दही घेत नसाल, तर ते चुकीचं आहे. कारण दही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 04:22 PM IST

रणरणत्या उन्हात दही खाल्ल्यानं होतात 'हे' फायदे

मुंबई, 23 मार्च : जेवणात सर्वसाधारणपणे दही असतंच.  तुमच्या जेवणात तुम्ही दही घेत नसाल, तर ते चुकीचं आहे. कारण दही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे.

दही प्रोबायटिक आहे. ते खास पोटासाठी उपयोगी आहे. उन्हाळ्यात दह्यामुळे तुमचं पोट थंड राहातं. अॅसिडिटी होऊ नये म्हणून दही खावं. दही हाडांसाठी उपयोगी आहे. त्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी नियमित दही खायला हवं. दह्यामुळे दात आणि नखंही चांगली राहतात. पेशींची वाढही दह्यामुळे चांगली होते.

दह्यात असलेलं प्रोटिन, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, विटामिन बी6 आणि बी12 शरीरासाठी उत्तम असतं. पोटाचे विकार दूर होतातच. शिवाय दह्यातले बॅक्टेरिया खूप उपयोगी आहेत. यानं तुमची त्वचा चमकते.


#FitnessFunda : मौनी राॅयच्या सुंदर चेहऱ्यामागचं 'हे' आहे रहस्य

Loading...


कंगनाचे हे 25 फोटो तुम्ही कधी पाहिलेच नसतील


गुरूला झाला पश्चात्ताप, राधिकाची मागणार माफी, तरीही मालिकेत अजून एक ट्विस्ट


दह्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते. जेवण पचण्यासाठी ताटात एक वाटी दही असलंच पाहिजे. बरेच जण दह्यात साखर घालून खातात. शक्यतो दह्यात साखर घालू नये. साखरेशिवाय दही खाण्यातली गोडी वेगळीच आहे.

दह्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सांधेदुखीवर दही जास्त प्रभावी आहे. दह्यामुळे हाडं मजबूत होतात.

दही हे ह्रदयासाठी खूपच फायदेशीर आहे. दही खाल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित राहतं. त्याचबरोबर दही ब्लड प्रेशरसाठीसुद्धा फायद्याचं आहे.

ज्या व्यक्ती दूध पित नाहीत त्यांच्यासाठी दही हा अतिशय योग्य पर्याय आहे, कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आहेत.

रोज एक चमचा दही खाल्याने आपलं वजन आटोक्यात राहतं आणि त्यामुळे आपलं आरोग्यही सुधारतं.  दह्यामुळे या रणरणत्या उन्हात होणाऱ्या अंगाच्या लाहीलाहीला कमी करण्यास मदत होते.


दही सौंदर्यवर्धक आहे. नुसतं दही चेहऱ्याला लावलं तरी चेहरा तजेलदार होतो. दह्याचं मसाज चेहऱ्याला करता येतं. चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरमं आली असली तरी दह्यात बेसनाचं पिठ मिक्स करून चेहऱ्यावर लेप लावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: curdhealth
First Published: Mar 23, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...