दही खा आणि तंदुरुस्त राहा

दही खा आणि तंदुरुस्त राहा

ज्या व्यक्ती दूध पित नाहीत त्यांच्यासाठी दही हा अतिशय योग्य पर्याय आहे, कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आहेत.

  • Share this:

25 जून : आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आपल्या रोजच्या वापरातलं दही. चला तर मग पाहुयात दह्याचे फायदे -

1) उन्हाळ्यात रोज दही खाल्याने आरोग्य चांगलं राहतंच पण त्याचबरोबर सौंदर्यातसुद्धा भर पडते.

2) या रणरणत्या उन्हात आपल्या शरीराला थोडी जास्तच काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी लागणारे विटॅमिन्स, प्रोबायोटिक्स आणि झिंक हे दह्यात भरपूर प्रमाणात आहे. याचबरोबर दह्यामुळे इम्युन सिस्टिमपण मजबूत राहते.

3) दही हे ह्रदयासाठी खूपच फायदेशीर आहे. दही खाल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रित राहतं. त्याचबरोबर दही ब्लड प्रेशरसाठीसुद्धा फायद्याचं आहे.

4) दही चवदार असतं. त्यामुळे आपल्या पचनक्रियेला मजबूत ठेवण्यास मदत होते, आणि दही पोटातील कोणत्याही इन्फेक्शनसाठी उपयोगी ठरतं.

5) ज्या व्यक्ती दूध पित नाहीत त्यांच्यासाठी दही हा अतिशय योग्य पर्याय आहे, कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आहेत.

6) दह्यामध्ये असणारं सी आणि डी विटॅमिन्समुळे हाडांसोबत दातांना मजबूत ठेवण्यास मदत होते.

7) रोज एक चमचा दही खाल्याने आपलं वजन आटोक्यात राहतं आणि त्यामुळे आपलं आरोग्यही सुधारतं.

8) दह्यामुळे या रणरणत्या उन्हात होणाऱ्या अंगाच्या लाहीलाहीला कमी करण्यास मदत होते.

First published: June 25, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या