• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • या कारणामुळे रोज खावं फोडणीचं वरण; चवीबरोबर मिळतील आरोग्यालाही फायदे

या कारणामुळे रोज खावं फोडणीचं वरण; चवीबरोबर मिळतील आरोग्यालाही फायदे

आपण चव वाढवण्यासाठी पदार्थाला फोडणी देतो. पण, फोडणी देण्यासाठी वापल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळेही त्याची न्युट्रिश्नल व्हॅल्यू वाढते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : आपल्या सगळ्यांनाच फोडणी घातलेलं वरण, डाल तडका असे पदार्थ आवडतात. वरण, सांबार, चटणी, रायता अशा विविध पदार्थांना खास पदार्थांची फोडणी दिली जाते. फोडणी दिल्यामुळे जेवणाची चव वाढते आणि कोणताही साधा पदार्थ टेस्टी (Testy) वाटायतो. मात्र, ही फोडणी जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) आहे. फोडणी देण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्या पदार्थांमध्ये आरोग्यदायी गुणधर्म असतात. हिंगाची फोडणी वरणाला फोडणी देताना लसूण (Galic) वापरल्यामुळे पोटाला त्रास होत नाही. वरणाला तुपाची फोडणी घातली तर, पचायला हलकी होतं. तर, उडदाच्या डाळीच्या वरणाला राईच्या तेलाची फोडणी घालताना लसूण आणि आलं वापरलं तर, पोटाला बाधत नाही. तुरीच्या डाळीच्या वरणामुळे पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर हिंगाची फोडणी घालावी. (Justin Bieber च्या गाण्यावर नर्सचा अ‍ॅब्युलन्समध्येच डान्स; पब्लिसिटीऐवजी झाले..) जेवणातली न्यूट्रिश्नल व्हॅल्यू वाढते डाळीच्या फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसणामुळे इम्युनिटी (Immunity) वाढते. लसणामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टरियल गुण असतात. त्यामुळे इन्फेक्शन, सर्दी, खोकला, डोकेदुखी सारखे त्रास कमी होतात. फोडणीत लसणाबरोबर हिंग, जिरं वापरलं तर, जेवणाची चव वाढून त्याची न्यूट्रिश्नल व्हॅल्यू (Nutritional Value) वाढते. शरीरात सोल्युबल व्हिटॅमिन्स अ‍ॅब्जॉर्ब करण्याची फॅट आवश्यक असतात. त्यामुळे फोडणीसाठी तूप वापरावं. (Microwave मध्ये पदार्थ गरम करतात? मग ही बातमी वाचाच आणि जाणून घ्या दुष्परिणाम) डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी फोडणीसाठी तेल जिरं, हिंग, मेथी दाणे, कढीपत्ता वापरला जातो. याचेही विविध फायदे आहेत. फोडणीत जिरं वापरलं तर, अ‍ॅसिडिटी आणि डायरीया यासारखा त्रास होत नाही. यामुळे डायजेस्टिव सिस्टम चांगली होऊ पचन क्रिया चांगली होते. पोट फुगण्याचा त्रास होत नाही. कोलेस्ट्रॉल कंट्रोल फोडणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी मदत होते. यामुळे पचन सुधारून डायबेटीसचा त्रासही होत नाही. कडीपत्त्यात फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ई, बी, ए, सी, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. (अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे रोज खा हिरवे दाणे) मसल्स मजबूत होतात फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोहरीमुळे मसल्स पेन कमी होतं आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येतो. पदार्थ करताना त्यामध्ये विविध प्रकारचे मसाले वापरले जातात पण, हे मसाले शिजल्यामुळे त्याचे पोषक घटक कमी होता मात्र, फोडणीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे पोषक घटक कमी होत नाहीत.
  Published by:News18 Desk
  First published: