Home /News /lifestyle /

दिवसभराच्या कामानंतरही चांगली झोप नाही लागत? आयुर्वेदात सांगितले आहेत हे गुणकारी उपाय

दिवसभराच्या कामानंतरही चांगली झोप नाही लागत? आयुर्वेदात सांगितले आहेत हे गुणकारी उपाय

दिवसभाराचा थकवा आल्यानंतर रात्री चांगली झोप येणे खूप महत्वाचे आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात 'निद्रानाश' ही समस्या जगभरातील कोट्यवधी लोकांमध्ये दिसून येते आहे.

  • myupchar
  • Last Updated :
    दिवसभाराचा थकवा आल्यानंतर रात्री चांगली झोप येणे खूप महत्वाचे आहे. गाढ झोपेमध्ये, शरीर ऊतींचे पुनरुज्जीवन करते. हृदय आणि रक्तवाहिन्यांचा उपचार आणि दुरुस्ती झोपेतच होते. झोपेअभावी हृदयरोग, मुत्रपिंडाचा रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. myupchar.comशी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली म्हणतात की निद्रानाश ही झोपेसंबंधी समस्या आहे, जी जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रभावित करते. यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना परिपूर्ण झोप मिळणे किंवा झोप लागणे कठीण होते. रात्री झोपेच्या अभावामुळे दिवसा झोप येणे, सुस्तपणा आणि तसेच शारीरिक आणि मानसिक आजार बळावतात. myupchar.comचे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणतात की झोप ही आयुर्वेदाच्या स्तंभांपैकी एक आहे. शरीराला संतुलित आणि निरोगी ठेवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. चांगली आणि परिपूर्ण झोप शरीर आणि मन दोघांना आराम देते. जर आपल्याला रात्री झोपताना त्रास होत असेल किंवा झोप चांगली येत नसेल तर काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. तेल मालिश डोक्यावर आणि पायांना भृंगराज तेल लावून मालिश केल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. या तेलाने मालिश केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो. योग्य नित्यक्रम असावा हा एक अतिशय महत्वाची उपाय आहे. चांगल्या झोपेसाठी वेळेवर झोपायला जाणे आवश्यक आहे. आपण वेळेत झोपायला न गेल्यास अनिद्रेची समस्या वाढेल गरम दूधाचे सेवन दुधात ट्रिप्टोपॉन असते जे झोप वाढविण्यात मदत करते. दररोज गरम दुधाचे सेवन केल्याने झोप येणे सोपे होईल. अर्धा चमचा दालचिनीची पूड एक कप कोमट दुधात मिसळा आणि झोपण्याआधी त्याचे सेवन करा. जायफळ गरम दुधाचे सेवन करणे फायदेशीर आहे आणि जर आपण त्यात जायफळ पावडर मिसळली तर निद्रानाशाची समस्या दूर होईल. झोपायच्या आधी एक कप गरम दूधात जायफळाची पूड मिसळून प्या. त्याचप्रमाणे फळांच्या रसात जायफळ घालून ते निजायच्या आधी प्यायल्यास देखील फायदेशीर आहे. केशरचा वापर चांगली झोप येण्यासाठी केशर देखील फायदेशीर आहे. एक कप गरम दुधामध्ये दोन चिमूटभर केशर मिसळून हे दूध प्या. केशर केवळ झोपेसाठीच फायदेशीर ठरत नाही तर त्यात रोगप्रतिकारक शक्तीला फायदा देणारे घटकही असतात. जिऱ्याचा वापर देखील फायदेशीर आयुर्वेदात औषधी गुणधर्म असलेल्या जिऱ्याला मोठे महत्त्व आहे. झोपेच्या आधी जिऱ्याचा चहा झोप येण्यास मदत करेल. इतकेच नव्हे तर दुधामध्ये केळी कुसकरून एक चमचा जिरे पूड घालून रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण खालल्याने फायदा होईल. जिऱ्यामध्ये मेलाटोनिन असते जो निद्रानाश आणि झोपेच्या इतर विकारांविरूद्ध लढते. मेलाटोनिन एक संप्रेरक आहे जो झोपेमध्ये मदत करतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - झोपेचा विकार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits, Sleep Deprived

    पुढील बातम्या