मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cucumber Side Effect : 'या' वेळी आणि जास्त प्रमाणात चुकूनही खाऊ नये काकडी, आरोग्यासाठी ठरते घातक

Cucumber Side Effect : 'या' वेळी आणि जास्त प्रमाणात चुकूनही खाऊ नये काकडी, आरोग्यासाठी ठरते घातक

सॅलड आणि कोशिंबीरीला काकडीशिवाय मजा नाही. तसेच डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी ककाडीइतका रामबाण उपाय सुद्धा दुसरा कोणताच नाही. मात्र या बहुगुणी काकडीचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

  मुंबई, 7 ऑगस्ट : काकडी खायला जवळपास सर्वानाच आवडते. काकडी आपले शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच ती आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. सॅलड आणि कोशिंबीरीला काकडीशिवाय मजा नाही. तसेच डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी ककाडीइतका रामबाण उपाय सुद्धा दुसरा कोणताच नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? या बहुगुणी काकडीचे काही दुष्परिणाम देखील आहेत. काकडी जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळेला खाल्यास तिचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. काकडीचे दुष्परिणाम काकडी खाण्यापूर्वी चांगले धुवा आणि नंतर ती सोलून घ्या. कच्ची काकडी खाल्ल्यानंतर अनेकांना गॅस आणि छातीत जळजळ होते. असा त्रास होत असल्यास काकडी सॉसपॅन किंवा ग्रिलमध्ये थोडावेळ ठेवा आणि नंतर खा. काकडीत cucurbitacins असतात आणि हा घटक व्हिटॅमिन सी मध्ये मुबलक प्रमाणात असतो. म्हणून जर तुम्ही जास्त प्रमाणात काकडी खाल्ली त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मांना हानी होते.

  अंड्यातील पिवळा बलक शरीरासाठी किती आरोग्यदायी असतो? नेमकी माहिती जाणून घ्या

  चुकीच्यावेळी खाऊ नये काकडी काकडी इतर पदार्थ पचवण्यास मदत करते. पण काकडी स्वतः लवकर पचत नाही. त्यामुळे ती जेवणापूर्वी काकडी खा आणि रात्री काकडी खाऊ नका. काकडी पचायला थोडा वेळ लागतो त्यामुळे रात्रीच्यावेळी हलके जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तरीही तुम्हाला काकडी खायची असेल तर तुम्ही ती सायंकाळी 7 वाजेपूर्वी खावी. यामुळे काकडी पचायला पुरेसा वेळ मिळतो.

  डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश, मानसिक आरोग्यही सुधारेल

  जर तुम्हाला किडनीचा आजार असेल तर जास्त प्रमाणात काकडी खाऊ नका. कारण काकडीत जास्त पोटॅशियम असल्यामुळे कमकुवत मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. तुम्हाला जर जास्त पाणी पिण्यावर बंदी असेल तर काकडी खाणे टाळा. कारण जास्त पाण्यामुळे हृदयावर ताण निर्माण होतो. काकडी आपल्या शरीराला थंड करते. मात्र त्यामुळे सायनसची समस्या वाढू शकते. म्हणून काकडी दिवसा आणि प्रमाणात खावी.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या