मुंबई, 04 डिसेंबर : तहानेनं व्याकूळ झालेला बिबट्या (bibtya) पाणी पिण्यासाठी तळ्याजवळ आला. त्यानं विचारही केला नसेल की आपला हा पाण्याचा शेवटचा घोट ठरेल. पाणी पिता पिता मगरीनं (crocodile) थेट त्याच्या तोंडावरच हल्ला केला आणि पाहता पाहता आता असलेला बिबट्या दुसऱ्याच क्षणी नाहीसा दिला. अवघ्या काही सेकंदात मगरीनं त्याला आपलं भक्ष्य बनवलं.
सोशल मीडियावर (social media) शिकारीचा हा थरारक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. ज्यात मगरीनं बिबट्याची शिकार केली आहे. मगर अगदी सावधपणे आपल्या भक्ष्यावर निशाणा साधते.समोरच्याला ती आपली साधी चाहूलही लागू देत नाही. त्याला कळायच्या आतच ती त्याच्यावर हल्ला करते, ज्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठीदेखील धडपड करता येत नाही. याला भला मोठा बिबट्याही अपवाद ठरला नाही.
बिबट्या जो एरवी सर्वांना आपली शिकार बनवतो त्याला एका मगरीनं अवघ्या काही सेकंदात संपवलं आहे. व्हिडीओत पाहू शकता. बिबट्या एका तलावाजवळ एकटाच पाणी पितो आहे. त्याचवेळी पाण्याच्या खालून हळूच मगर येते. जी बिबट्याच्या नजरेलाही पडत नाही. बिबट्या अगदी पाण्याच्या किनारी गटागटा पाणी पितो आहे. मगर पाण्याखालून अगदी त्याच्या तोंडाच्या जवळच येते आणि बिबट्या पळणार इतक्यात त्याच तोंडच आपल्या जबड्यात धरते. ज्यामुळे बिबट्याला पळणंही शक्य होत नाही. पाहता पाहता ती त्याला घेऊन पाण्याच्या आता जाते. बिबट्या आणि मगर दोघंही दिसेनासे होतात.
@Saket_Badola या ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 60 सेकंदात संपला! शिकारीच स्वतः झाला शिकार. जंगलाचा नियम, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.