OMG VIDEO : तुमच्या लाडक्या कुत्र्यांसाठी हे आहे फाइव्ह स्टार हॉटेल!

OMG VIDEO : तुमच्या लाडक्या कुत्र्यांसाठी हे आहे फाइव्ह स्टार हॉटेल!

तुम्ही नेहमीच्या रूटीनमुळे बोअर झालात की पार्लरमध्ये जाऊन स्वत:चं कोडकौतुक करून घेता,वीकेंडला फाइव्ह स्टार हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये जाऊन ब्रेक पण एन्जॉय करता. पण असंच एखादं फाइव्ह स्टार हॉटेल कुत्र्यांसाठीही असू शकतं का ? तुम्हाला ही नुसती कल्पना वाटतेय ना... पण असं हॉटेल आणि स्पा खरंच आहे आणि तेही भारतात, गुरगावमध्ये !

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : तुम्ही नेहमीच्या रूटीनमुळे बोअर झालात की पार्लरमध्ये जाऊन स्वत:चं कोडकौतुक करून घेता,वीकेंडला फाइव्ह स्टार हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये जाऊन ब्रेक पण एन्जॉय करता. पण असंच एखादं फाइव्ह स्टार हॉटेल कुत्र्यांसाठीही असू शकतं का ? तुम्हाला ही नुसती कल्पना वाटतेय ना... पण असं हॉटेल आणि स्पा खरंच आहे आणि तेही भारतात, गुरगावमध्ये !

या डॉग हॉटेलमध्ये तुमच्या लाडक्या कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आलिशान सूट आहेत. इथल्या गुबगुबीत गाद्यांवर तुमचे आवडते पेट्स मस्त आराम करू शकतात, इथल्या स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहू शकतात. स्पामध्ये जाऊन मसाजही घेऊ शकतात !

तुम्हाला फिरायला बाहेर जायचं असेल आणि तुमच्या लाडक्या कुत्र्यांना कुठे ठेवायचं अशी जर चिंता असेल तर डोन्ट वरी ! तुम्ही तुमच्या लाडोबांना या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन ठेवू शकता.

कुत्र्यांसाठी इथे राहायची मस्त सोय आहेच शिवाय त्यांच्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या खेळण्यासाठी अत्याधुनिक प्लेग्राउंडही आहे. शिवाय या हॉटेलमध्ये त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी एलइडी टीव्हीवर छानछान फिल्म लावलेल्या असतात. त्यामुळे त्यांना घरीच असल्याचा भास होतो. एवढी सगळी मौजमजा झाल्यावर झोपण्यासाठी इथे वेलवेट बेडही आहेत !

‘थ्री इडियट्स’च्या या पन्नाशीतल्या अभिनेत्याला 18 वर्षाच्या मुलीनं केलं लग्नासाठी प्रपोज

तुमचं तुमच्या कुत्र्यावर खूप प्रेम असेल आणि त्याने तुमच्या गैरहजेरीतही आनंदी राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा तरी त्याला इथे घेऊनच या. इथे येणाऱ्या आणखी कुत्र्यांसोबत मिळून मिसळून राहायची सवय लागली की तुमचा कुत्रा एकलकोंडाही बनणार नाही.गुरगावच्या या क्रिटरॅटी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आपल्या कुत्र्यांना घेऊन येणारे सगळेच जण खूशही असतात आणि रिलॅक्सही. त्यांच्या लाडोबांना प्रेमाचं आणि हक्काचं घर मिळालेलं असतं आणि त्यांचा ताणही काहीसा हलका होतो!

=========================================================================================================

ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या वर्दीतील गायकाचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 08:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading