Home /News /lifestyle /

ALERT! 70 लाख भारतीय Credit-Debit Card होल्डर्सचा डेटा लिक

ALERT! 70 लाख भारतीय Credit-Debit Card होल्डर्सचा डेटा लिक

70 लाख Credit-Debit Card युझर्सची खासगी माहिती ऑनलाइन लिक झालेली आहे.

    नवी दिल्ली, डिसेंबर : तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातील तब्बल 70 लाख डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्सचा खासगी डेटा लिक झालेला आहे. भारतीय सायबर सिक्युरिटी रिसर्चरनं (Indian cyber security researcher) ही धक्कादायक माहिती दिली आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया (Rajshekhar Rajaharia) यांनी 70 लाख भारतीय डेबिट आणि क्रेडिट कार्ड युझर्सचा प्रायव्हेट डेटा ऑनलाइन लिक झाल्याचं सांगितलं. राजशेखर यांना डार्क वेबवर (Dark Web forums) हा डेटा आढळून आला आहे. राजशेखर यांनी हे गुगल ड्राइव्ह फोल्डर News18 शी देखील शेअर केलं आहे. जवळपास 1.3GB चा हा डेटा आहे. ज्यात 58 स्प्रेडशीट आहेत. बँक आणि शहरानुसार या माहिती आहे. डेटा पाहिल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्याचं समजतं आहे. यामध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पूर्ण नंबर नाही किंवा कार्डबाबत सविस्तर माहिती नाही. मात्र त्यात युझर्सचं नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी, क्रेडिट कार्ड टाइप, पगार, जन्मतारिख, पत्ता आणि इतर ओळख दाखणारी माहिती आहे. कदाटित हा डेटा थर्ड पार्टीकडून आला असावा ज्या बँकांना सेवा पुरवतात असा असा एक अंदाज बांधला जातो आहे. मात्र ऑनलाइन असा डेटा उपलब्ध झाल्यानं हॅकर्स या डेटाचा दुरूपयोग करू शकतात अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे. राजशेखर यांनी Inc42 ला याबाबत सर्वात आधी माहिती दिली होती. त्यांनी CERT-In कडे याबाबत तक्रार केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिक्रिया आली नसल्याचं सांगितलं आहे. न्यूज 18 नं देखील CERT-In शी संपर्क साधला.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cyber crime, Shopping debit card

    पुढील बातम्या