भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पाहा 'हे' घरगुती उपाय

भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पाहा 'हे' घरगुती उपाय

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचं प्रमाण जास्त वाढतं. टाचांना भेगा पडून नयेत यासाठी हे उपाय करून पाहा.

  • Share this:

मुंबई: हिवाळ्यात त्वचेचा मुलायमपणा कमी होऊन रुक्ष होते. थंडीत पाण्यात खूपवेळ राहिल्य़ानं किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. टाचांमधून रक्त येतं किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो. त्यासाठी बऱ्याचवेळा आपण क्रीमचा वापर करत असतो. काहीवेळा क्रीमने तेव्हड्यापुरतं बरं होतं. मात्र हा त्रास तात्पुरता बरा होतो. काहींना क्रीमची अॅलर्जी असते अशावेळी थोडी आपली आपण काळजी घेतली आणि घरगुती उपाय केले तर थंडीतही तुमच्या टाचा मुलायम राहातील.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही बाहेरून जाऊन आल्यावर पाय स्वच्छ धुवा. आपल्य़ा पायाला माती राहणार नाही याची काळजी घ्यावी. मातीमुळे पायात जंतू राहतात आणि पायाची त्वचा कोरडी पडते.

हील बामचा वापर करा.

टाचांना पडलेला भेगांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही हील बामचा वापर करू शकता. हा बाम लावल्यानंतर तुमच्या टाचांवरील मृत त्वचा निघून जाते आणि टाचा मुलायम करण्यास मदत करतो. हील बाममध्ये यूरिया, साइलिसियल अॅसिड असणं आवश्यक आहे. ही क्रीम लावल्यानंतर पायात मोजे घालावेत.दिवसातून दोन ते तीन वेळा या क्रीमचा वापर केल्याच परिणाम लवकर दिसून येतात.

मृत त्वचा काढून टाका.

टाचांवर मृत त्वचा राहिल्यामुळे चालताना ही त्वचा अधिक त्रास देऊ शकते. तसंच टाचांना असलेल्या भेगा अधिक तीव्र होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी कोमट पाण्यात पाय ठेवून ही मृत त्वचा काढून टाकावी. त्यानंतरच क्रीम किंवा पेट्रोलियम जेलचा वापर करावा.

नारळाचं तेल, तूप, कोरफडीचा करा उपयोग.

रुक्ष झालेली त्वचा मुलायम करण्यासाठी नारळाचं तेल हा उत्तम पर्याय आहे. नारळाचं तेल अंघोळीच्या पाण्यातही वापरलं तरी हरकत नसते. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलानं टाचांना हलक्या हाताने मालिश करावी.तुमच्या टाचांमधून रक्त येत असेल किंवा टाचांना सूज येत असेल तर खोबरेल तेल सूज कमी करण्यासाठी गुणकारी औषध समजलं जातं. खोबरेल तेलामध्ये अँटीमिक्रोबियल गुण असतो. त्यामुळे दोन वेळा तुम्ही हलक्या हातांनी पायांवर मालिश केल्याचा त्याचा फरक पडतो. अशाच पद्धतीनं तूप आणि कोरफडही तुम्ही पायांना लावू शकता. कोरफड आणि तुपामुळेही त्वचेतील सुक्षपणा, खरखरीतपणा कमी होण्यास मदत होते.

First published: November 18, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading