Calculator सांगणार तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा किती धोका?

Calculator सांगणार तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा किती धोका?

एखाद्याला कोविड-19 ची लागण (Infection) झालीच, तर त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता किती आहे, याचं गणित मांडणारा ऑनलाइन कॅल्क्युलेटर शास्त्रज्ञांनी आता विकसित केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 16 डिसेंबर : कोरोना (Corona) विषाणूमुळे कित्येकांचा बळी गेला आहे. एखाद्याला कोविड-19 ची लागण (Infection) झालीच, तर त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता किती आहे, याचं गणित मांडणारा ऑनलाइन कॅल्क्युलेटर शास्त्रज्ञांनी आता विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचाही समावेश असून, या संशोधनाबद्दलचा लेख नेचर मेडिसिन (Nature Medicine) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनविषयक लेखात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या कॅल्क्युलेटरचा (Calculator) उपयोग सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना विविध समुदायांमध्ये मृत्यूची शक्यता आजमावण्यासाठी होणार आहे. त्यामुळे अशा गटांना किंवा समुदायांना लसीकरणावेळी प्राधान्यक्रम देणं शक्य होऊ शकेल.

हा कॅल्क्युलेटर एका अल्गोरिदमवर (Algorithm) आधारित आहे. कोविड-19 मुळे मृत्यूचा धोका असलेल्यांचा शोध घेण्यासाठी वय, लिंग, सामाजिक घटक आणि आरोग्याच्या विविध स्थिती यांबद्दल झालेल्या अभ्यासातील माहिती हा अल्गोरिदम वापरतो. सध्या लागण न झालेल्या लोकांपैकी कोणाला लागण होण्याचा धोका भविष्यात आहे, तसंच लागण झाल्यास गुंतागुंत (Complications) होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील असे घटक कोणते आहेत, याबद्दलचा अंदाज हा कॅल्क्युलेटर देतो.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स (John Hopkins) ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेमध्ये कार्यरत असलेले नीलांजन चॅटर्जी यांनी सांगितलं, की आम्ही विकसित केलेल्या कॅल्क्युलेटर संख्यात्मक पद्धतीने काम करतो आणि कोविड-19 चा धोका शोधून काढण्यासाठी असलेल्या अन्य प्रस्तावित दर्जात्मक मार्गदर्शक तत्त्वांसोबत त्याचा वापर योग्य ठरेल. चॅटर्जी हे या अभ्यासातील वरिष्ठ संशोधक आहेत.

हे वाचा - दिलासा! कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त; पाहा CORONA TEST चे नवे दर

हा कॅल्क्युलेटर इच्छुक व्यक्ती, तसंच सरकारी अधिकाऱ्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध करण्यात आला आहे. वय, लिंग, वंश आणि वैद्यकीय इतिहास यांच्या आधारे या कॅल्क्युलेटरच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला कोविड-19च्या लागणीच्या धोक्याचा अंदाज घेता येईल. तसंच, एखादा विशिष्ट समुदाय, संस्था विद्यापीठ आदींमधल्या व्यक्तींना किती धोका आहे, याचाही अंदाज याद्वारे घेता येणार आहे.

प्रत्येक काउंटीनुसार किंवा शहरानुसार तिथल्या लोकसंख्येला होणाऱ्या लागणीच्या धोक्याच्या प्रमाणात वाढ किंवा घट होत असल्याचंही शास्त्रज्ञांनी या संशोधनातून दर्शवलं आहे. उदाहरणार्थ, लागण होण्याचा पाचपट धोका असलेल्या प्रौढांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत वेगवेगळ्या शहरांमध्ये फरक आहे. लेटन (उटाह) येथे 0.4 टक्के, तर डेट्रॉइट (मिशिगन) येथे 10.7 टक्के धोका आहे, असं चॅटर्जींनी नमूद केलं.

वैयक्तिक पातळीवरील घटक आणि समुदाय पातळीवरील घटक यांच्या माहितीचं एकत्रीकरण करून कॅल्क्युलेटरच्या साह्याने व्यक्तिगत पातळीवरच्या धोक्याचं गणित मांडता येतं. त्यामुळेच जेव्हा मोठी लाट येते, तेव्हा संबंधित समुदायात व्यक्तिगत धोका असलेल्यांची संख्या वाढलेली असेल.

हे वाचा - कोरोनामुक्त रुग्णांना होतोय Brain fog; नेमकी काय आहे ही समस्या?

महासाथीची राज्य पातळीवरची वैविध्यपूर्ण माहिती समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने सध्या हा कॅल्क्युलेटर दर आठवड्याता अपडेट केला जातो आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यातही अशीच एक सुविधा विकसित करण्यात आली होती. ज्या ठिकाणी संबंधित व्यक्ती राहते, त्या ठिकाणच्या कोविड-19 पेशंटची ताजी स्थिती त्याद्वारे कळण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे एखाद्या सामुदायिक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही, याचा निर्णय त्याद्वारे घेता येत होता.

समजा तुम्ही आज अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये आहात. तुम्ही 10 जणांच्या गटात असाल, तर कोविड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता 18 टक्के आहे. हेच प्रमाण पॅरिसमध्ये 32 टक्के आहे. युझरने आपण किती जणांच्या समुदायात आहोत, याची माहिती दिल्यावर तो संबंधित कार्यक्रम, संबंधित जिल्हा किंवा काउंटीमध्ये कोविड-19चा किमान एक पेशंट असेल असे गृहीत धरून शक्यता वर्तवली जाते.

Published by: Priya Lad
First published: December 16, 2020, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading