मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केस गळणं हे Coronavirus चं नवं लक्षण? अभ्यासातून नवी माहिती आली समोर

केस गळणं हे Coronavirus चं नवं लक्षण? अभ्यासातून नवी माहिती आली समोर

हेअर फॉलवर प्रभावी उपाय

हेअर फॉलवर प्रभावी उपाय

आता केसांचं गळण्याचादेखील कोरोनाशी संबंध (Coronavirus news symptoms) असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये यावर अभ्यास देखील झाला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
इंडियाना (अमेरिका), 26 ऑक्टोबर : Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात आता कुठे नव्या कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असतानाच फ्रान्स, अमेरिका  अशा देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर  Covid-19 ची काही नवी लक्षणं समोर येत आहेत. आता केसांचं गळण्याचादेखील कोरोनाशी संबंध असल्याची चर्चा आहे. केस गळणं हे देखील कोरोनाचं लक्षण असल्याचं नवीन संशोधनात पुढे आलं आहे. आतापर्यंत कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणं आढळून येत होती. त्याचबरोबर काही जणांना श्वास घेण्यात अडचण आणि वास न येणं किंवा गंध ओळखण्यात देखील अडचण येत होती. पण आता यामध्ये केस गळणं हे देखील नवीन लक्षण आढळून येत आहे.  केस गळतात म्हणून नुसती काळजी करत बसण्याऐवजी टेस्ट करणं हिताचं आहे. काही रुग्णांमध्ये आढळली लक्षणे अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. नताली लाम्बर्ट आणि त्यांच्या टीमने 1500 जणांचा अभ्यास केला गेला. हे रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत पण त्यातून बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यात लक्षणं आढळून आली आहेत. त्याचबरोबर कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांचे केस देखील खूप वेगाने गळू लागले. पण केस गळण्याची ही समस्या काही रुग्णांमध्येच आढळून आली. तणावदेखील कारण या अभ्यासात सर्व रुग्णांनी व्हर्च्युअली सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात केस गळत असल्याचं म्हटलं आहे. पण कोरोनाच्या चिंतेमुळे आणि तणावामुळे हे केस गळत असतील असे जाणकारांना वाटतं. अनेकदा जास्त तणाव आल्यास केस गळू शकतात. त्याचबरोबर शरीरामध्ये पोषकतत्वांची कमतरता असणं हेदेखील एक कारण आहे. त्यामुळे तणावापासून दूर राहण्यासाठी पोषक आहार आणि योग्य जीवनशैली ठेवायला हवी. ताणामुळे शरीरावर विविध परिणाम होतात. त्यातून कोरोनाग्रस्त रुग्ण ताणाखाली असेल तर त्याला अधिक त्रास होऊ शकतो. केस गळण्याचं ते एक कारण असू शकतं असं संशोधकांचं मत आहे. पण या संशोधनामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कोरोनाची विविध लक्षणं आहेत तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासू शकता. टेस्ट केल्यावर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकतं.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या