Home /News /lifestyle /

औषधांची नाही गरज, फक्त आवाजाने मारला जाऊ शकतो CoronaVirus; तज्ज्ञांचा दावा

औषधांची नाही गरज, फक्त आवाजाने मारला जाऊ शकतो CoronaVirus; तज्ज्ञांचा दावा

इलेक्ट्रो फ्रिक्वेन्सी वायब्रेशन (electro frequency vibration) या मॉडेलने कोरोनाव्हायरसचा (coronavirus) नाश होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 06 एप्रिल : एकीकडे कोरोनाव्हायरचा नाश करण्यासाठी बायोकेमिकल मॉडेल म्हणजे औषधांच्या रूपात रासायनिक पदार्थांचा व्हायरसवर मारा केला जातो आहे. तर आता दुसरीकडे औषधांशिवाय या व्हायरसला मारण्याचा मार्ग सापडला आहे. ईएफव्ही (इलेक्ट्रो फ्रिक्वेन्सी वायब्रेशन) या मॉडेलने कोरोनाव्हायरसचा नाश होऊ शकतो, असा दावा केला जातो आहे. काही दिवस 61 मिनिटं खर्च करून कोणतीही कोरोनाग्रस्त व्यक्ती व्हायरसमुक्त होऊ शकते. यासाठी फक्त 21 मिनिटं काही आवाजांचा प्रतिध्वनी ऐकावा लागेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. काय आहे इलेक्ट्रो फ्रिक्वेन्सी वायब्रेशन? साउंड थेरेपीस्ट इक्वांक आनखा यांनी हे मॉडेल प्रस्तावित केलं आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येक पदार्थाची स्वत:ची एक आवृत्ती असते, ज्यावर त्याचे तरंग प्रतिध्वनीत होतात. मानवी शरीराचीही स्वत:ची आवृत्ती असते आणि ती प्रतिध्वनीत होते. आपलं शरीर इलेक्ट्रो मॅग्नेटीक पल्सवर काम करतं. जेव्हा आपलं हृदय नीट काम करत नाही तेव्हा इलेक्ट्रो मॅग्नेटीक डिव्हाइस पेसमेकर लावलं जातं जे इलेक्ट्रीक पल्स पाठवून हृदयाला योग्य आवृत्तीवर काम करण्यास सांगतात. हे वाचा-तबलिगींचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, 2 मजल्यांची परवानगी; बांधली 7 मजली इमारत कोणताही व्हायरस जी एक पेशी असते, जी स्वत:ची आवृत्ती आणि प्रतिध्वनी आपल्या शरीरावर थोपते आणि व्हायरस शरीरात पसरून शरीराला कमजोर करतं. कसं काम करणार? संशोधकांनी कोरोनाचे जीनोम, पॉलिमर्स आणि प्रोटीनचे 3 वेगवेगळे आवृत्ती आणि प्रतिध्वनी शोधलेत. हेडफोनमार्फत साउंड वेब संक्रमित रुग्णाला पाठवले जातील. जे ब्रेनवेव ट्रान्समिशनच्या सिद्धांतानुसार शरीरात पसरतील. ईएफव्ही मॉडेलच्या सिद्धांतानुसार, कोरोनाव्हायरसचे हे भाग बाहेरील विरोधी आवृत्तीचा प्रतिध्वनी देऊन तोडता येऊ शकतात, असं मानलं जातं. जर व्हायरसचा जोड तुटला तर हा व्हायरस निष्क्रिय होऊन मरून जाईल. हे करताना ईसीजी, एलएफटी केलं जाईल, जेणेकरून रुग्णाच्या आरोग्याची माहिती मिळेल. हे वाचा-दिल्लीतील मरकज प्रकरणावर अखेर शरद पवारांचं परखड भाष्य
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या