नवी दिल्ली, 21 जानेवारी: भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी होत असते. विविध इ- कॉमर्स साईट आपल्या ग्राहकांसाठी सूट देत असतात. परंतु अनेकदा कंपनीला चुकीमुळे मोठा फटका सहन करावा लागतो. अशाच पद्धतीची एक घटना ओरिसामध्ये समोर आली आहे. 2014 मध्ये अमेझॉन (Amazon) या ऑनलाईन साईटवरून ओरिसामधील एका कायद्याचे(Law Student) शिक्षण घेणाऱ्या सुप्रियो रंजन महापात्रा या विद्यार्थ्याने 190 रुपयांमध्ये लॅपटॉप (Laptop) बुक केला. इतक्या कमी किमतीत लॅपटॉप मिळत असल्याने कोण खरेदी करणार नाही. या विद्यार्थ्याने देखील तात्काळ लॅपटॉपची गरज असल्याने बुक केला. परंतु काही तासांनंतर कंपनीकडून त्याला ऑर्डर रद्द करण्याविषयी मेल आला. कस्टमर केअर विभागाने त्याला किमतीमध्ये घोळ झाल्याचे सांगून त्याची ऑर्डर रद्द झाल्याचे सांगितले.
परंतु यानंतर सुप्रियो रंजन महापात्रा याने ग्राहक न्यायालयात दाद मागितली. यामध्ये त्याने अमेझॉनविरोधात(Amazon) तक्रार नोंदवल्यानंतर ओडिशा राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने ( Odisha State Consumer Dispute Redressal Commission) त्याच्या बाजूने निकाल देत त्याला मानसिक त्रास झाल्याची भरपाई म्हणून 40 हजार रुपये आणि न्यायालयीन कामकाजाची भरपाई म्हणून 5 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ऑनलाईन यादीमध्ये कोणता लॅपटॉप होता हे स्पष्ट झालेलं नाही, पण बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या विद्यार्थ्याला 22,899 रुपयांचा आणखी एक लॅपटॉप खरेदी करावा लागला. यामध्ये आयोगाने दिलेल्या निकालामध्ये म्हटले आहे, अमेझॉनने 23,499 रुपये मूळ किंमत असलेला लॅपटॉप 190 रुपयांमध्ये विक्रीसाठी ठेवला होता. म्हणजेच यामध्ये त्यांनी 23,309 रुपये डिस्काउंट दिला होता.
हे देखील वाचा - Airtel चे 2 नवे रिचार्ज प्लॅन लाँच; केवळ 78 रुपयांत 5GB डेटासह मिळेल अनलिमिडेट म्युझिक
दरम्यान, या निकालात आयोगाने म्हटले, अमेझॉनने (Amazon) खरेदीदाराला योग्य सेवा देण्यात निष्काळजीपणा केला आहेच परंतु अयोग्य पद्धतीने व्यापार देखील केला आहे. याचबरोबर अमेझॉनच्या सेवेत कमतरता असल्याचे मत देखील आयोगाने नोंदवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Online shopping