मुंबई, 13 ऑक्टोबर : अनेकदा नवरा - बायकोची भांडणं झाल्यानंतर ते एकमेकांपासून दूर वेगळे झोपतात (sleeping). मात्र खरंतर वेगळं झोपल्याने त्या दोघांमधील नातं (relationship) अधिक घट्ट होतं. लग्नानंतर नातं टिकवायचं असेल तर एकत्र नाही तर वेगळं झोपणं फायदेशीर आहे, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
एका मॅट्रेस कंपनीने काही जोडप्यांचा अभ्यास केला. सहापैकी एक जोडपं एकमेकांपासून वेगळं झोपत असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांना एकमेकांसोबत झोपायचं नव्हतं म्हणून नाही तर त्यांना रात्री शांत झोप हवी होती म्हणून ते एकमेकांपासून दूर झोपत होते.
झोपेबाबत गेल्या 35 वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या डॉ. नील स्टेनली म्हणाल्या, जोडप्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झोपावं असं मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे आणि या गोष्टीला पाठिंबा देणारी मी पहिला असेन.
2005 साली डॉ. नील स्टॅनली यांनीदेखील एक संशोधन केलं होतं. त्या संशोधनात सहभागी जोडप्यांच्या शरीराला झोपताना एक यंत्र लावण्यात आलं होतं. या यंत्रात त्या व्यक्तींच्या झोपेशी संबंधित घटकांची नोंद केली जात होती. यामध्ये एकत्र झोपल्याने त्या दोघांच्याही झोपेवर परिणाम होत असल्याचं दिसून आलं.
हे वाचा - पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा
दुसऱ्या एका संशोधनानुसार, ज्या जोडप्यांची झोप अपुरी होते त्यांच्यामध्ये घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते. अपुरी झोप जोडप्याच्या नात्यांवर अधिक परिणाम करते. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते, अपघात होतात, टाइप 2 डायबेटिस, नैराश्य या सर्व अडचणींना सामोरं जावं लागतं.
हे वाचा -कसं फसवलं! प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO
झोप पूर्ण होत नाही यासाठी कोणतेही असं ठोस कारण असू शकत नाही. झोप ही मानवाची प्राथमिक गरज आहे आणि सामाजिक दबावाखाली राहून पतीपत्नींनी आपल्या झोपेला तिलांजली देण्यात कोणतंच शहाणपण नाही. लोक वेगवेगळं झोपणं सहसा तसं पसंत करत नाही. पण उच्च वर्गातील समाजात लग्न खूप काळ टिकून राहायला नवरा बायकोंच्या स्वतंत्र खोल्या असणं हेही एक कारण असल्याचं एका पुस्तकात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Relationship, Sleep, Wedding couple, Wife and husband