मुंबई, 22 डिसेंबर : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) सगळं जग ठप्प झालं आहे. कोरोनाचं नवं म्युटेशन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर तर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) नियम पाळण्याची सक्ती अधिकच कडक केली जाते आहे. अशात मोठे सण-उत्सव एकत्रित येऊन साजरे करण्यावर बहुतेक सर्व ठिकाणी बंदी आहे.
बहुतांश देशांमध्ये विविध सण-समारंभ साजरे करण्याच्या पद्धतीवर वेगवेगळे निर्बंध घातलेले दिसतात. लग्नांनाही हे लागू आहे. लग्नात (Marriage) किती लोक यावेत याचे नियम शासनाने केलेले आहेत. मात्र एका जोडप्याने आपल्या लग्नात थेट 10000 लोक बोलावले. खास गोष्ट ही, की यादरम्यान त्यांनी कोरोनाबाबतचे नियमही तंतोतंत पाळले! सोशल डिस्टन्सिंगबाबकचा एकही नियम मोडला नाही. वाचा त्यांनी काय जुगाड केला....
बीबीसीच्या वृत्तानुसार, मलेशियात झालेल्या या लग्नात ही अनोखी शक्कल लढवण्यात आली. या देशा लग्नसोहळ्यांना केवळ 20 लोकांना बोलावण्याची मुभा होती. पण जोडप्यानं शक्कल लढवली. या जोडप्यानं आपल्या लग्नाला ड्राइव थ्रू इव्हेंटचं रूप दिलं. त्यातून थेट 10 हजार लोकांना बोलावण्याचा मार्ग स्वत:साठी मोकळा करून घेतला.
'ड्राइव थ्रू' म्हणजे लोक आपापल्या कार्समध्ये बसून आले आणि इव्हेंटच्या जागी येताच त्यांनी आपल्या कारचा वेग कमी केला. लग्नानंतर रविवारी सकाळी हे जोडपं मलेशियाच्या एका शासकीय इमारतीजवळ जाऊन बसलं. यादरम्यानही लोक त्यांना बघायला येत राहिले.
नवरा टेंगकू मोहम्मद हाफिज हा मलोशियाचे माजी मंत्री आणि मोठे राजकीय नेते असलेले टेंगकू अदनान यांचा मुलगा आहेत. विशेष हे, की टेंगकू यांचा जन्मदिवसही रविवारीच होता. नवरीचं नाव ओसियन एलाजिया आहे.
टेंगकू अदनाननं फेसबुकवर लिहिलं आहे, की सकाळपासून 10 हजार कार्स तिथं आल्याची माहिती त्याला मिळाली आहे. कोरोनाविषयक नियमांचं पालन करत या आनंदाच्या प्रसंगात सहभागी झाल्याबद्दल त्यानं लोकांचं आभार मानलं. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ 3 तासात 10 हजार लोक येऊन गेले. या लोकांना आधीपासूनच पॅक करून ठेवलेल्या जेवणाची मेजवानीही देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.