नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : पती-पत्नीमधील छोटे-मोठे (Husband-wife clashes) वाद कधी-कधी घटस्फोटापर्यंत पोहोचतात. घटस्फोटानंतर (Divorce) दोन जण त्यांच्या आयुष्यात वेगळ्या मार्गाने जातात आणि पुन्हा स्वतःचं जीवन जगणं सुरू करतात. मात्र, प्रत्येकाचं जीवन इतकं सोपं नसतं. एका महिलेनं रिलेशनशिप पोर्टलवर सांगितलंय की, तिच्या पतीपासून वेगळं होण्याच्या निर्णयाचा तिच्यावर कसा परिणाम झाला आणि तिचा एक्स-पती तिचा कसा छळ करत आहे.
या महिलेनं लिहिलंय की, 'माझ्या पतीचं नाव कुर्त आहे आणि तो नेहमी खूप चिडखोरपणा करायचा. जर त्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याच्या सभोवतालच्या प्रत्येकाला त्याबद्दल माहिती होत असे. मात्र, तो खूप हास्य-विनोदही करत असे. यामुळं मी त्याच्या या रागाकडे नेहमी दुर्लक्ष करायचे. 18 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न केलं. लग्नाच्या २ वर्षांनंतर मला दोन मुलं झाली. जसजसा वेळ जात होता, तसतसं मला माझ्या पतीचं दुसरं रूप दिसत होतं. तो पूर्वीपेक्षा जास्त चिडखोर आणि रागीट बनला होता. तो नेहमी माझ्यावर ओरडत असे.
हे वाचा - ‘Desi Look’ मध्ये दिसली प्रियांका चोप्रा; ट्रॅडिशनल अंदाजात चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
कुर्तला लवकरच ऑफिसमध्ये बढती मिळाली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढला. तो खूप व्यग्र राहू लागला आणि घरीही खूप कमी वेळ घालवत असे. त्याला मुलांची अजिबात काळजी नव्हती. मुलांची काळजी घेण्यासह घरातील सर्व कामं मी एकटीनं करायचे आणि जेव्हा मी कुर्तशी याबद्दल बोलायचे, तेव्हा तो माझी चेष्टा करायचा किंवा माझ्यावर ओरडायचा. कधी कधी तो मला म्हणायचा की 'अजून मी काय करू शकते. जर मला घटस्फोट घ्यायचा असेल तर मी तोदेखील घेतला पाहिजे आणि असे म्हणत तो मोठ्यानं हसत असे.'
'माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना कुर्तबद्दल चांगलंच माहीत होतं आणि मीही लोकांना माझ्या घरी बोलावणं बंद केलं होतं. कारण कुर्तला तेही आवडत नसे. एके दिवशी मी नको म्हणत असतानाही माझे काही मित्र माझी काळजीनं माझ्या घरी आले. त्याच दिवशी कुर्तचं ऑफिसमध्ये कोणाशी तरी भांडण झालं होतं आणि तोही लवकर घरी आला. घरी येताच तो आमच्या मुलांसमोर आणि सर्वांसमोर माझ्यावर जोरात ओरडू लागला. मी त्याच वेळी माझ्या मित्रांना परत पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी ठरवलं होतं की मी यापुढं या माणसासोबत राहू शकत नाही.
'कुर्त ऑफिसला गेल्यावर मी माझी मुलं आणि त्यांच्या काही आवश्यक गोष्टी घेऊन मित्राच्या घरी गेले. मी कुर्तला फोन करून माझा निर्णय सांगितला. सुरुवातीला तो मोठ्यानं हसला आणि त्यानंतर त्यानं मला धमक्या देण्यास सुरुवात केली. 'माझ्या आयुष्यातील काही दिवस मी एन्जॉय करायला हवेत. कारण, हे माझ्या मुलांसोबतचे माझे शेवटचे दिवस आहेत,' असं तो म्हणाला. 'त्याच्याशी लग्न करणं आणि त्याच्यासोबत राहणं माझ्यासाठी कठीण आहे, असं मला वाटत असेल तर, त्याच्यापासून घटस्फोट घेणं आणखी कठीण आहे, हे मला लवकरच कळेल,' असंही तो म्हणाला.
कुर्तनं ताबडतोब एक वकील नेमला आणि आम्हा दोघांचं शेअरिंग बँक खातं बंद केलं. कुर्त माझ्यासाठी रोज नवीन समस्या निर्माण करत होता. मला वाटायचं की त्याच्याकडं ऑफिसची खूप कामं आहेत, पण आता त्यानं आपला सगळा वेळ माझं आयुष्य नरक बनवण्यात घालवण्यास सुरुवात केली. आता आमच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं आहे. घटस्फोटासाठी सुरू असलेली कायदेशीर लढाई सुरू ठेवण्यासाठी मला माझ्या कुटुंबावर आणि मित्रांवर खूप अवलंबून राहावं लागत आहे. अलीकडे मी माझ्या पालकांकडून खूप मोठी रक्कम उधार घेतली आहे, जेणेकरून मी कायदेशीर लढाईचा खर्च करू शकेन.
'आता तो माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्यांना रस्त्यात मध्येच थांबवतो आणि भेटवस्तू देतो. त्यांना अभ्यास करू देत नाही. त्यांना नेहमी बाहेर खायला घेऊन जातो. तो मुलांसमोर अगदी संत बनतो आणि मला उलट फोनवर मेसेज करतो आणि म्हणतो की तो मला धडा शिकवत राहील. मला माहीत नाही की, माझ्या एक्स-पतीसोबतचा हा संघर्ष कुठे संपेल आणि मी अधिकृतपणे त्याच्यापासून कधी वेगळी होऊ शकेन.
हे वाचा - टेकडीवर उभं राहून पत्नीचं सुरू होतं फोटोशूट; अवघ्या 5 सेकंदात काळाने घातला घाला
कुर्तच्या प्रकारावरून सल्ला देताना, घटस्फोटाच्या बाबतीतील कायदेतज्ज्ञानं लिहिलंय, "भांडण आणि शत्रुत्वात घटस्फोट घेणं नेहमीच महाग असतं आणि परस्पर संमतीनं कोणताही निर्णय घेण्याच्या तुलनेत त्याचे अनेक तोटे आहेत." अशा परिस्थितीत, एकट्यानं घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केलं पाहिजे. मित्र आणि कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी बोलल्यानंतरच कोणतंही पाऊल उचललं पाहिजे. तुमचं ईमेल खातं आणि पासवर्ड सर्व बदलले पाहिजेत. नातेसंबंधातून बाहेर पडण्यासाठी जोडीदारासोबत बसून प्रत्येक मुद्द्यावर बारकाईनं बोलणं अधिक योग्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Relationship tips