VIDEO - 'रुग्णांचा जीव जाईल'; परिस्थितीमुळे हतबल आणखी एका डॉक्टरच्या अश्रूंचा बांध फुटला

VIDEO - 'रुग्णांचा जीव जाईल'; परिस्थितीमुळे हतबल आणखी एका डॉक्टरच्या अश्रूंचा बांध फुटला

कोरोनाची सद्यपरिस्थिती (Coronavirus) पाहता मुंबईतील डॉ. तृप्ती गिलाडा (Dr. Truptil gilada) यांच्यानंतर आता दिल्लीतील एका डॉक्टरचा व्हिडीओ समोर येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : एकिकडे रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे अपुरी (Oxygen shortage) पडणारी आरोग्यव्यवस्था. या दोघांमध्ये तारेवरची कसरत करावी लागते आहे ती डॉक्टरांना. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आपल्या परीने जे शक्य आहे ते सर्व करत आहेत. पण तरी परिस्थितीसमोर आता तेसुद्धा हतबल झाले आहे. कोरोना काळातील ही भयाण परिस्थिती आणि रुग्णांची अवस्था पाहून आता डॉक्टरांनाही रडू कोसळलं आहे. मुंबईतील डॉ. तृप्ती गिलाडा (Dr. Trupti gilada) यांच्यानंतर आता दिल्लीतील एका डॉक्टरचा व्हिडीओ समोर येत आहे.

नोएडातील शांती मुकूंद रुग्णालयातील (shanti mukund hospital) सीईओ सागर सग्गर (Sunil Saggar) यांनी आपल्या रुग्णालयातील कोरोनाची परिस्थिती मांडली आहे. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याचदमम्यान त्यांनी आपल्या रुग्णालयातील परिस्थिती सांगतील. एनआयशी बोलताना त्यांनी सांगितलं, ज्या रुग्णांना सोडता येऊ शकतं, त्यांना आम्ही डिस्चार्ज दिला आहे. आमच्याकडे काही तासांपुरताच ऑक्सिजन शिल्लक आहे. अशा परिस्थिती रुग्णांचा जीव जाऊ शकतो.

असं सांगत असतानाच डॉ. सागर यांना हुंदकाच येतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि त्यांच्या अश्रूंचा हा बांध फुटतो.

हे वाचा - 'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती सांगताना मुंबईतील डॉक्टरला कोसळलं रडू

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ डॉक्टर या कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही राहिलं नाही. दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठीच ते झटत आहेत. यादरम्यान त्यांच्यावरही ताण आहे. डॉक्टर असले तरी एक माणूनस म्हणून त्यांनाही मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. रुग्णांना पाहून त्यांच्याही मनात भावना दाटून येत आहेत. पण एक डॉक्टर म्हणून स्वत:ला ते रुग्णांसमोर मजबूत ठेवत आहे. रुग्णांचं मनोधैर्य वाढवत आहेत. जेणेकरून ते खचणार नाहीत. त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल.

हे वाचा - ...म्हणून त्या दिवशी अश्रू अनावर झाले, डॉ.तृप्ती यांनी सांगितले कारण...

कोरोना रुग्णांना मानसिक आधार द्यावा यासाठी रुग्णालयात रुग्णासमोर डान्स असो, गाणी गाणं असो असं काय काय नाही डॉक्टर करताना दिसले. पीपीई किटमध्ये त्यांची अवस्था वाईट होती पण तरी त्यांनी चेहऱ्यावर हसू ठेवलं. आता मात्र परिस्थिती अशी झाली आहे, की ज्या रुग्णांसाठी ते धडपड करत आहे, त्यांची अवस्था अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अशी झाली की इच्छा असूनही डॉक्टर काहीच करू शकत नाही आहेत. त्यांच्या हातात काहीच नाही. त्यामुळे त्यांची ही तळमळ आता अश्रूंच्या रूपाने बाहेर पडते आहे.

Published by: Priya Lad
First published: April 22, 2021, 9:49 PM IST

ताज्या बातम्या