Home /News /lifestyle /

नाक-तोंड मास्कने झाकलात; तरी 'या' भागातून कोरोना शरीरात जाण्याचा धोका

नाक-तोंड मास्कने झाकलात; तरी 'या' भागातून कोरोना शरीरात जाण्याचा धोका

सरकारने सांगितले आहे की, N-95 मास्क मधील व्हॉल्व्ह कोरोनाव्हायरसला बाहेर काढण्यास मदत करत नाही. N-95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अपयश ठरला आहे.

सरकारने सांगितले आहे की, N-95 मास्क मधील व्हॉल्व्ह कोरोनाव्हायरसला बाहेर काढण्यास मदत करत नाही. N-95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अपयश ठरला आहे.

शरीराचा हा खुला असलेला भाग कोरोनाव्हायरससाठी एंट्री पॉईंट ठरू शकतो.

    मुंबई, 08 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) वाचण्यासाठी आपण सर्वच जण मास्क (mask) लावत आहोत, हात धुत आहोत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहोत किंबहुना काही जण तर घराबाहेर पडताना हँड ग्लोव्हजही वापरत आहेत. जेणेकरून कोणत्याच मार्गाने कोरोनाव्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या शरीराचा असा भाग आहे, जिथून कोरोनाव्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो आणि हा भाग म्हणजे डोळा (eye). द लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी नाक, तोंड झाकण्याइतकंच डोळ्यांनाही सुरक्षा देणं आता महत्त्वाचं होणार आहे. 16 देशांमध्ये करण्यात आलेल्या 170 अभ्यासांच्या समीक्षावर हा निष्कर्ष आधारित आहे. हे वाचा - स्टार्टर म्हणून काढा, व्हॉट्सअ‍ॅपवर मेन्यूकार्ड; कोरोनामुळे बदलली हॉटेलमधील सेवा आता तुम्ही म्हणाल मी स्वच्छ हात धुतो, त्याशिवाय डोळ्यांना हात लावत नाही. मग कोरोनाव्हायरस शरीरात कसा जाईल. तर तुमच्याजवळील व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर ते ड्रॉपलेट्स ज्याप्रमाणे तुमच्या नाका-तोंडामार्फत शरीरात जाऊ शकतात तसेच ते डोळ्यांमार्फतही शरीरात जाऊ शकतात. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोरोनाव्हायरस हा डोळ्यांमार्फतही पसरू शकतो, असं सांगितलं. कशी द्याल डोळ्यांना सुरक्षा? त्यामुळे डोळ्यांच्या सुरक्षेसाठी व्हायजर, फेस शिल्ड, गॉगल्स किंवा मोठा चष्मा वापरण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण कोरोनापासून बचाव करणारा मास्क नीट हाताळला नाही तर त्यापासूनच व्हायरसचा धोका आहे, तसंच डोळ्यांना संरक्षण देणाऱ्या या वस्तूंपासूनही आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करताना तुम्ही डोळ्यांना संरक्षण देत असला तर संरक्षणासाठी जो चष्मा, गॉगल, फेस शिल्ड वापरणार आहात तोदेखील नीट स्वच्छ करून घेणं महत्त्वाचं आहे, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या