नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : ऑक्सफोर्डच्या (oxford university) कोरोना लशीपाठोपाठ (corona vaccine) भारतात ट्रायल सुरू असलेल्या रशियाच्या कोरोना लशीची (russian corona vaccine) किंमतही जारी करण्यात आळी आहे. Sputnik V लशीची किंमत जारी झाली आहे. या लशीच्या एका डोसची किंमत 10 डॉलरपेक्षाही कमी म्हणजे 740 रुपयांपेक्षाही कमी असेल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियाची लस Sputnik V अगदी कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. इतर कोरोना लशींपेक्षा आपली लस स्वस्त असल्याचा दावा रशियानं केला आहे. या लशीचं इतर देशात उत्पादन घेणाऱ्या भागीदारांसह रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) आपला करारही विस्तारीत केला आहे. 2021 पर्यंत 500 दशलक्षपेक्षा अधिक लोकांसाठी लशीचं उत्पादन घेण्याचं उद्देश आहे. भारतातील डॉ. रेड्डीज कंपनीनं रशियन लशीसाठी RDIF शी करार केला आहे. भारतात या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.
हे वाचा - ... तर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच भारतात देणार CORONA VACCINE
मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. ही लस कोरोनापासून बचावासाठी 95 टक्के परिणामकारक ठरल्याचं रशियानं सांगितलं आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.
हे वाचा - CORONA महासाथीचा अंत जवळ, WHO देणार गूड न्यूज; भारतीय तज्ज्ञांचा दावा
रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी ही लस अगदी कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.
ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीची किंमत किती?
दरम्यान ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची कोव्हिशिल्ड लस 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची यामध्ये भागीदारी आहे. सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी एनडीटीव्हीशी बोलताना, या लसीचा एक डोस जर फार्मसीमधून विकत घेतला तर त्याची किंमत 1000 रुपये असेल, मात्र सरकारला 250 रुपये प्रति डोस दराने लस दिली जाईल. पूनावाला यांच्या कंपनीने सरकारबरोबर लस मोठ्या प्रमाणात तयार करण्याचा करार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की लसीचे सुमारे 4 कोटी डोस आधीच तयार केले गेले होते.
कोरोना लशीबाबत पंतप्रधान मोदींनी मुख्यत्र्यांसोबत घेतली बैठक
पंतप्रधान मोदींनी गुजरात, हरयाणा, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हर्च्युअल मीटिंग घेतली. त्यामध्ये गृहमंत्री अमित शाहा देखील सामील झाले होते. "लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीने राबवली पाहिजे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आतापासून तयारी करणं आवश्यक आहे. आपल्या आरोग्य सेवकांना आणि आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस मिळेल याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे", असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.