मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मोदी सरकारला मोठा धक्का! ज्या CORONA VACCINE ची प्रतीक्षा ती संशयाच्या घेऱ्यात

मोदी सरकारला मोठा धक्का! ज्या CORONA VACCINE ची प्रतीक्षा ती संशयाच्या घेऱ्यात

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

भारतात ट्रायल सुरू असलेल्या याच कोरोना लशीकडून (corona vaccine) सर्वांना आशा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही लस उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच दिशेनं मोदी सरकारनं लशीकरणाची तयारीही सुरू केली आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांत  जगभरातील तीन कोरोना लशींबाबत (corona Vaccine) गूड न्यूज मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये या लशी 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University), अॅस्ट्राझेनका (AstraZeneca) आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची (Serum institute of india) लस. या लशीच्या परिणामाबाबत जारी करण्यात आलेल्या आकड्याबाबत आता संशय व्यक्त केला जातो आहे.

सोमवारी कंपनीनं जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं. पहिला डोस दिल्यानंतर त्याचे परिणाम 90 टक्क्यांपर्यंत दिसून आले होते. मात्र दुसऱ्या डोसनंतर 62 टक्के परिणामकारकता दिसल्याचं सांगितलं जात आहे. दोन्हीचं एकत्र विश्लेषण केल्यास ही लस 70 टक्के परिणामकारक असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र आता लशीच्या ट्रायलबाबात नवा खुलासा होतो आहे. दोन वेगवेगळ्या समूहांना दोन वेगवेगळे डोस देण्यात आले आहोत. एका समूहाला दोन समान पूर्ण डोस देण्यात आले. तर दुसऱ्या समूहाला एक अर्धा आणि एक पूर्ण डोस देण्यात आला होता. पहिल्या समूहात जास्तीत जास्त लोकांचा समावेश होता, ज्यांच्यावर लस 62 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं तर दुसऱ्या समूहात कमी लोक असूनही त्यांच्यावर लस 90 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं.

ऑक्सफर्डनंदेखील आपण लशीच्या डोसमध्ये बदल केल्याचं स्वीकार केलं आहे. एक पूर्ण डोस देण्याऐवजी अर्धा डोस देण्याचं ठरलं. मात्र आता सर्वांना एकच डोस दिला जाणार आहे, असंही स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात, कोरोना लस निर्मात्या 'सीरम'ला भेटअमेरिकेतील लस विकसित करण्यासाठी फंडिंग कार्यक्रम ऑपरेशन वार्प सीडचे प्रमुख मोन्सेफ स्लाओई यांनी मंगळवारी खुलासा केला की, दुसऱ्या समूहात फक्त 55 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाचे लोक होते. अशा लोकांमध्ये कोव्हिड 19 चा गंभीर परिणाम होण्याचा धोका कमी असतो. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकानं सोमवारी आपल्या लशीचा ट्रायलचा  अहवाल जारी करताना वयाची माहिती दिली नाही.

विश्लेषक ज्योफ्री बोर्जेस यांनी सांगितलं की, अॅस्ट्राझेनकानं छोट्या समूहावर करण्यात आलेल्या ट्रायलचा परिणाम दाखवला. कंपनीनं आपल्या परिणामांमध्ये मोठी गडबड केली आहे. त्यामुळे अमेरिकेत याला परवानगी मिळणार नाही.

फाइझरचे ग्लोबल रिसर्च अँड डेव्हलमेंट युनिटचे माजी प्रमुख जॉन लामॅटिना यांनी ट्वीट केलं की, या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणं कठीण आहे. ट्रायलच्या मध्येच डोस का बदलले, दोन वेगवेगळ्या समूहाला वेगवेगळे डोस का दिले, याचं स्पष्ट कारण देण्यात आलेलं नाही.

हे वाचा - कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार मोदी सरकार, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

भारतात या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पुढील वर्षात ही लस उपलब्ध होईल मात्र त्याआधीच लशीला आपात्कालीन मंजुरीही मिळू शकते, असं सांगितलं जातं आहे. यूकेतील ट्रायलच्या अहवालावर भारतात या लशीला आपात्कालीन मंजुरी द्यायची की नाही हे ठरेल, असं सांगण्यात आलं. मात्र आता या लशीच्या ट्रायलवरच प्रश्नचिन्हं उपस्थित होत असतील. तर कदाचित या लशीला भारतातही आपात्कालीन वापरासाठी लवकर मंजुरी मिळणार नाही.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus