नवी दिल्ली, 03 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (britain) कोरोना लशीच्या (covid 19 vaccine) वापराला मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता भारतात कोरोना लस (corona vaccine) कधी मिळणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. दरम्यान यूकेपाठोपाठ (UK) आता भारतातही लवकरच कोरोना लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्सनं AIIMS ही मोठी माहिती दिली आहे.
भारतात सध्या ज्या कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे त्या लशींना याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आपात्कालीन वापरासाठी या लशींना परवानगी दिली जाऊ शकते.
In India, we now have vaccines which are in their final trial stage. Hopeful that by the end of this month or early next month we should get emergency use authorisation from Indian regulatory authorities to start giving vaccine to public: Dr Randeep Guleria, Director,AIIMS Delhi pic.twitter.com/rk3HllDAYp
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, "भारतात काही लशी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या वर्षाच्या अखेरला किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळण्याची आशा आहे.
"लस सुरक्षित आहे याचा पुरेसा डेटा उपलब्ध आहे. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याच कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. 70,000-80,000 लोकांना लस देण्यात आली. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नाही", असंही त्यांनी सांगितलं.
ब्रिटन ठरला पहिला देश
यापूर्वी कोरोना व्हायरस लस मंजूर करणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे.
ब्रिटनमधून जगाला दिलासा देणारी बातमी आल्यानंतर काही तासांनी पुतीन यांनी रशियन सरकारला मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आदेश दिल्याने आता 2020 च्या अखेरीस जगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रशियातही पुढच्या आठवड्यापासून लशीकरण
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुढच्या आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Mass Vaccination) करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सर्व जग कोरोनावरचं औषध शोधत असतांनाच रशियाने ‘स्पुतनिक-V’ (Sputnik V) औषध शोधून बाजी मारल्याचा दावा केला होता. त्याचं मानवी परिक्षणही यशस्वी ठरल्याचा दावाही रशियाने केला होता. हे औषध खुद्द पुतीन यांच्या मुलीलाच दिलं गेल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं.
तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार CORONA VACCINE
पुढच्या वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2020 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे.
भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.