मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महाभयंकर CoronaVirus चा नाश करणारी लस 4 वर्षांपूर्वीच तयार, मात्र....

महाभयंकर CoronaVirus चा नाश करणारी लस 4 वर्षांपूर्वीच तयार, मात्र....

कोरोनाविरोधातील लस (coronavirus vaccine) 4 वर्षांपूर्वीच तयार झाली आहे, मात्र सरकारी अनास्थेमुळे पुढील काम बंद झालं,  असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरोधातील लस (coronavirus vaccine) 4 वर्षांपूर्वीच तयार झाली आहे, मात्र सरकारी अनास्थेमुळे पुढील काम बंद झालं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरोधातील लस (coronavirus vaccine) 4 वर्षांपूर्वीच तयार झाली आहे, मात्र सरकारी अनास्थेमुळे पुढील काम बंद झालं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
वॉशिंग्टन, 14 एप्रिल : कोरोनाव्हायरसने (CoronaVirus) जगभरात 19 लाख लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे, तर 1 लाखापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महाभयंकर व्हायरसचा नाश करणारं औषध आणि लस कधी येणार याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. मात्र या व्हायरसची लस 4 वर्षांपूर्वीच तयार झाली आहे, मात्र सरकारच्या अनास्थेमुळे लसीचं पुढील काम बंद झालं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या बेलर कॉलेज ऑफ मेडिसीनच्या (Baylor college of medicine) नेशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनने 2016 सालीच कोरोनाव्हायरसविरोधात लस बनवली होती. त्याचे क्लिनिकल ट्रायलही पूर्ण झाले होते, असा दावा केला आहे. मात्र अमेरिकेच्या नेशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने काम बंद करण्यास सांगितल्याचं म्हटलं. नेशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या डॉ. मारिया एलीना बोट्टाजी यांनी सांगितलं, "आम्ही कोरोनाव्हायरसवरील लसीचं आम्ही ट्रायलही पूर्ण केलं होतं. त्यानंतर आम्ही अमेरिकेच्या नेशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थला ही लस क्लिनिकमध्ये पोहोचवण्याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी यात काही रस नसल्याचं दाखवलं. ही लस सुरुवातीला चीनमध्ये उद्रेक होऊन इतर देशात पसरलेल्या सार्सविरोधात होती. तिथं या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं." जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग अमेरिकाच नव्हे तर जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसविरोधातील शोध फक्त यासाठी बंद करावे लागले कारण बहुतेक आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आलं आणि त्यानंतर यात कुणाला रस राहिला नाही. पुढील संशोधनासाठी शास्त्रज्ञांना पैसे जमवण्यात अडचण येत होती. नवा SARS-Cov-2 हा व्हायरसही 2002 मधील सार्ससारखाच आहे. त्यामुळे याच लसीवर आता पुढे काम केलं जातं आहे, नव्या कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं आहे. CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं डॉ. मारिया म्हणाल्या, "हे दोन्ही व्हायरस आनुवंशिकरित्या 80% एकसारखेच आहेत. त्याविरोधातील लसीची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. ही लस कशी प्रतिक्रिया देते याचं उदाहरण आपल्याकडे असतं. अशात नव्या कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने लस तयार करणं खूप सोपं झालं असतं." संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या