Coronavirus : भारतातील 86 टक्के मृतांमध्ये 'ही' बाब समान

Coronavirus : भारतातील 86 टक्के मृतांमध्ये 'ही' बाब समान

Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या सर्वाधिक रुग्णांना आधीपासून कोणता ना कोणता आजार होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 06  मार्च: भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 4 हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत, तर 114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या बाबतीत सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात कोरोनाव्हायरसमुळे मृत झालेल्या 63 टक्के रुग्णांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, तर 86 टक्के रुग्णांना मधुमेह, हायपरटेन्शनची आणि हृदयाचे आजार होते. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणा-यांमध्ये 30 टक्के लोकं 40-60 वयोगटातील आहेत आणि फक्त 7 टक्के लोकं 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

भारतातही कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणा-यांचा आकडा इतर देशांप्रमाणेच आहे, जिथं 60 ते 80 वयोगटातील व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. जरी 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यचं प्रमाण 37 टक्के असलं तरी 86 टक्के लोकं अशी आहेत, ज्यांना आधीपासून कोणता ना कोणता आजार होता. त्यामुळे ज्या तरुणांना असे आजार आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका आहे. त्यामुळे अशा तरुणांनी विशेष काळजी घ्यावी.

महाभयंकर Coronavirus ला पाहिलंत आता त्याचा आवाजही ऐका

शिवाय महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरचा प्रभाव जास्त आहे. भारतात आतापर्यंत 76 टक्के पुरुष कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आलेत. तर मृतांमध्येही 73 टक्के पुरुष आहेत. त्यामुळे पुरुषांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका, हात स्वच्छ धुवा, तोंडाला मास्क लावा, कुणाला सर्दी, खोकला, ताप असेल अशा व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका. तुम्हीही शिंकताना, खोकताना नाक, तोंड झाकलं जाईल याची काळजी घ्या आणि कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव करा.

VIDEO : शास्त्रींच्या कमेंट्रीचा पोलिसांकडून असाही वापर, लोकांना लावलं पळवून

First published: April 7, 2020, 10:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading