Home /News /lifestyle /

डोळे लाल होणं हे Coronavirus चं लक्षण आहे का?

डोळे लाल होणं हे Coronavirus चं लक्षण आहे का?

कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सने सांगितल्यानुसार बहुतेक रुग्णांचे डोळे लाल (red eye) होते.

    वॉशिंग्टन, 29 मार्च : सर्दी, खोकला, ताप, छातीत वेदना याशिवाय डोळे लाल होणं हेदेखील कोरोनाव्हायरसचं एक (Coronavirus) लक्षण असू शकतं. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची इतर लक्षणं दिसलेली नाहीत, त्यांचे डोळे लाल (red eye) असल्याचं एका नर्सनं सांगितलं आहे. किकर्लंडच्या लाइफ केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स चेल्सी अर्नेस्ट यांना अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांचे डोळे लाल झालेले दिसलेत. किर्कलँडमध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वात जास्त प्रकरणं आहेत. हे वाचा - धक्कादायक! फक्त 20 मिनिटात एका माणसामुळे 4 जणांना झाली Coronavirus ची लागण सीएनएनशी बोलताना नर्स चेल्सी यांनी सांगितलं, 'कोरोनाव्हायरस झालेल्या जवळपास प्रत्येक रुग्णाचे डोळे लाल झाले होते. 'या रुग्णांच्या डोळ्यांच्या आतील पांढरा भाग लाल नव्हता तर डोळ्यांच्याभोवती लाल वर्तुळ तयार झालं होतं. या रुग्णाला पाहिल्यानंतर असं वाटत होतं, त्यांच्या डोळ्यांना अॅलर्जी झाली आहे.  शिवाय इमर्जन्सी सेवेत असलेल्या डॉक्टरांनीही रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग आहे का, त्यांचे डोळे लाल आहेत का?, याबाबत विचारणा केली होती' आमच्याकडे असे अनेक रुग्ण आले, ज्यांचे फक्त डोळे लाल होते, त्यांच्यामध्ये व्हायरसची इतर लक्षणं नव्हती.  ज्यांचे डोळे लाल आहेत, मात्र दुसरी कोणती लक्षणं नाहीत, अशा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे', असंही त्या म्हणाल्या. हे वाचा - LockDown मुळे घरी बसलेल्या लोकांसाठी... VIDEO Streaming साठी आता कमी डेटा लागणार शिवाय अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थलमोलॉजीने रविवारी एक अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये व्हायरसच्या संसर्गामुळे कंजेक्टिवायटिस होऊ शकतं, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होण्यासह डोळे लालही होतात. मात्र सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने डोळे लाल होणं हे कोरोनाव्हायरसचं लक्षण नसल्याचं सांगितलं. गाइडलाइननुसार ताप, खोकला, श्वास घेण्यात समस्या याशिवाय छातीत वेदना, ओठ निळे पडणे ही कोरोनाव्हायरसची लक्षणं असू शकतात. हे वाचा - ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स यांनाही व्हायरसचा विळखा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या