FACT CHECK : घसा कोरडा पडला म्हणजे Coronavirus चा संसर्ग होण्याची भीती जास्त?

FACT CHECK : घसा कोरडा पडला म्हणजे Coronavirus चा संसर्ग होण्याची भीती जास्त?

तुमचा घसा सारखा कोरडा पडत असल्यास तुम्हाला Covid-19 असण्याची किंवा Corona संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. काय आहे या viral message मागचं तथ्य?

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : अनेकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेसेज फिरत असतात. त्याची सत्यासत्यता पडताळलेली नसते. सध्या Coronavirus संदर्भात असे अनेक मेसेज whatsapp वरून फिरत आहेत. या आजाराची लक्षणं, औषधं, समज, गैरसमज इत्यादी बरीच माहिती या मेसेजमध्ये असते. मात्र अनेकदा ते खोटे असतात. सध्या देखील अशाच प्रकारे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घशातील कोरडेपणासंबंधी एक पोस्ट viral होत आहे. तुमचा घसा सारखा कोरडा पडत असल्यास तुम्हाला Covid-19 असण्याची किंवा Corona संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशा अर्थाची ही पोस्ट आहे; पण घाबरायचं कारण नाही या पोस्टबद्दलचं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे ही व्हायरल पोस्ट

'तापाचा हा नवीन विषाणू  भयंकर आहे. त्यामुळे या काळात तुमच्या घशाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमचा घसा करडा पडू देऊ नका. सतत पाणी पीत रहा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करू शकणार नाहीत.' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र या पोस्टमध्ये दिलेली माहिती खोटी आहे.

सत्य काय आहे

या पोस्टमागील सत्य समजवून सांगताना थायलंडच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य संचालक डॉ. सुथात छोटानापन म्हणाले, 'कोरडा घसा झाल्याने विषाणू शरीरात प्रवेश करतात हे म्हणणं चुकीचं आहे. या गोष्टीत काहीही तथ्य नाही. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. चुलालॉंगकोर्न विद्यापीठातील रोग प्रतिबंधक आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. थिरा वोराटानारात म्हणाल्या, ' कोरडा घसा आपल्या शरीरातील विषाणू वाढण्यास कारणीभूत ठरत नाहीत. घशावाटे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. पेशींवाटे विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे घसा कोरडा पडला तर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे ही या मेसेजमध्ये सांगितलेली गोष्ट खोटी आहे.'

Coronavirus : ...म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कोविडचे रुग्ण; पहिल्यांदाच समोर आलं कारण

देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सरकारने विविध प्रकारे जनजागृती करत लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक नागरिक अजूनही याचे पालन व्यवस्थित करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे.

हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या (centre for cellular and molecular biology, Hyderabad) संशोधनात समोर आले आहे की, भारतात कोरोनाच्या A2a या स्ट्रेनने मोठ्या प्रमाणात रुग्ण संक्रमित केले आहेत.

हैदराबादच्या CCMB चे संचालक डॉ. राकेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताबरोबरच जगभरात देखील A2a स्ट्रेनने कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. भारतात सध्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत.भारतात A3i स्ट्रेनचे रुग्ण अधिक होते त्यामुले A2a वर येणारी लस किती उपयोगी ठरेल ही शंका आधी शास्रज्ञांना वाटत होती पण आता A2a स्ट्रेनमुळेच कोरोना संसर्ग होत आहे त्यामुळे ती लस भारतातील रुग्णाला लागू पडेल.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 21, 2020, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading