लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही असू शकतो Coronavirus, काय आहे सत्य?

लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही असू शकतो Coronavirus, काय आहे सत्य?

कोरोनाव्हायरस (Coronavirus) अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरातील कॉम्प्युटर (computer), लॅपटॉपवरून (laptop) काम करत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमुळेही कोरोनाव्हायरसचा धोका असू शकतो.

एम्स भोपाळचे डायरेक्टर आणि सीईओ प्रोफेसर सरमन सिंह आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ रजनीकांत दास यांनी दैनिक भास्करला दिलेल्या माहितीत सांगितलं की, मोबाईल, कॉम्प्युटर यांच्यामार्फतही कोरोनाव्हायरस पसरू शकतो. कोरोनाव्हायरसची लागण झालेले रुग्ण तुमच्या आसपास असतील, तर हा संसर्ग उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटर, लॅपटॉपही रोज स्वच्छ करण्याची गरज आहे.

हे वाचा - लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही असू शकतो Coronavirus, काय आहे सत्य?

त्यामुळे कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी कॉम्प्युटर लॅपटॉप नेमका कसा स्वच्छ करावा जाणून घेऊयात.

सर्वात आधी हातात ग्लोव्हज घाला.

कॉम्प्युटर, लॅपटॉप बंद ठेवा.

इतर उपकरणं जोडलेली असतील तर ती काढा

70 टक्के sopropyl alcohol आणि 30 टक्के पाणी घेऊन त्यामध्ये मायक्रोफायबर क्लोथ भिजवा. पेपर टॉवेल, टॉयलेट पेपर अशा वस्तू वापरू नका.

लिक्विड थेट उपकरणांवर स्प्रे करू नका

कापडानं हळुवारपणे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप स्वच्छ करा

किबोर्डच्या आत, डिस्प्ले, युएसबी पोर्ट अशा भागांवर पाणी पडणार नाही, याची काळजी घ्या.

सुरुवातीला डिस्प्ले स्वच्छ करून घ्या. त्यानंतर किबोर्ड, यूएसबी, पॉवर हे सर्व स्वच्छ करा.

डिस्प्ले स्क्रिन स्वच्छ करताना एकाच दिशेने स्वच्छ करा. शक्यतो वरच्या दिशेपासून खालील दिशेवर स्वच्छ करत या.

कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरू करण्यापूर्वी पूर्णपणे कोरडा झालेला असेल, याची काळजी घ्या.

उपकरणाची पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर ग्लोव्हज काढून टाका आणि हात स्वच्छ धुवा.

हे वाचा - सावधान! तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जिवंत असू शकतो कोरोना व्हायरस

First published: March 28, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या