इतके प्रयत्न करूनही कोरोना नियंत्रणात का नाही? शास्त्रज्ञांच्या हाती लागली मोठी माहिती

इतके प्रयत्न करूनही कोरोना नियंत्रणात का नाही? शास्त्रज्ञांच्या हाती लागली मोठी माहिती

सायलेंट ट्रान्समिशनचा (Silent Transmission) प्रकार जगभरात कोरोना संसर्ग पसरवण्यात महत्त्वाचा घटक ठरला आहे, हे संशोधनातून दिसून आलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 16 अमेरिका : जवळपास एक वर्षे लोटलं तरी कोरोनाव्हायरसला (Coronavirus) थोपवण्यात कोणत्याच देशाला यश मिळालं नाही. भारतच नाही तर अमेरिकेसारख्या बड्या देशालाही ते शक्य होत नाही आहे. कोरोना (Covid 19) नियंत्रणात राहणं तर दूर उलट तो अधिकच फोफावत चालला आहे. त्याला आवरणं कठीण काय जणू अशक्यच झालं आहे. इतके प्रयत्न करूनही कोरोनावर नियंत्रण का मिळवता येत नाही आहे, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आणि याचं उत्तर अखेर संशोधकांना सापडलं आहे.

कोरोना संक्रमाणासाठी जबाबदार असणारा सार्स-कोव्ह-2 (SARS-Cov-2) हा विषाणू (Virus) हवेच्या माध्यमातून फैलावत (Coronavirus spread through air) असल्याचा ठोस पुरावा मिळाला आहे. लॅन्सेटमध्ये (Lancet) प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच सार्वजनिक आरोग्याच्या उपायांनी विषाणू संसर्ग रोखण्यात यश मिळत नाही. कारण हवेतील विषाणूमुळे संसर्ग फैलावत असून नागरिक असुरक्षित आहेत. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडातील 6 संशोधकांनी याबाबत संशोधन करून तसे पुरावे जमा केले आहेत.

या संशोधनामध्ये कोऑपरेटिव्ह इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन इनव्हायरमेंट सायन्सेसचे (CIRES) केमिस्ट जोस लुईस जिमेनेज हे देखील सहभागी झाले होते. जिमेनेज यांनी याबाबत सांगितलं, हवेच्या माध्यमातून संक्रमण होत असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. ड्रॉपलेट ट्रान्समिशनला (Droplet Transmission) समर्थन देणारे पुरावे मात्र अगदी नगण्य आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी काम करणाऱ्या अन्य संस्थांनी हे वैज्ञानिक पुरावे स्वीकारावेत जेणेकरून हवेमुळे होणारे संक्रमण रोखण्यासाठी पावलं उचलता येतील.

हे वाचा - Mumbai Fight Back! मुंबई कोरोनाला पुन्हा हरवणारच; नवे आकडे देतायेत चांगले संकेत

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या त्रिश ग्रीनहॅल यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांच्या पथकाने प्रकाशित संशोधनाचा आढावा घेतला असून हवेमुळे होणाऱ्या संक्रमणाची पुष्टी करणारे पुरावे तपासले आहेत.

इनडोअर व्हेंटिलेशनमुळे संसर्ग घटतो

त्यांच्या सुचित पहिल्या स्थानावर स्कागिट चर्चमधील गायन स्थळासारखी सुपर स्प्रेडर इव्हेंट (Super Spreader Event) आहे. यात एका व्यक्तीमुळे 53 लोक बाधित झाले होते. यात अभ्यासाअंती असं स्पष्ट होते की जवळचा संपर्क, समान पृष्ठभाग किंवा वस्तूंना स्पर्श करणे अशा युक्तीवादांद्वारे पुरेशा प्रमाणात सांगता येऊ शकत नाही. यापेक्षा मोठी गोष्ट अशी की सार्स-कोव्ह-2 (SARS-Cov-2) चा संसर्ग आऊटडोअरपेक्षा इनडोअरमध्ये जास्त प्रमाणात होतो आणि इनडोअर व्हेंटिलेशनमुळे संसर्गात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतं.

हवेच्या माध्यमातून संसर्गाचे मिळाले ठोस पुरावे

या पथकानं अधोरेखित केलं आहे की खोकला किंवा शिंका येत नसलेले म्हणजेच कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांपैकी किमान 40 टक्के लोक हे संसर्ग पसरवण्यात हातभार लावत आहेत. हा सायलेंट ट्रान्समिशनचा (Silent Transmission) प्रकार जगभरात कोरोना संसर्ग पसरवण्यात महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे हवेच्या माध्यमातून संसर्ग फैलावत आहे, यास अधिक पृष्टी मिळते. जे लोक कधीच एकत्र आले नाहीत परंतु ते हॉटेल्समधील खोल्यांमध्ये होते, अशा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. याउलट हवेतून थेंब (Droplets) पृष्ठभागावर पडल्याने हा विषाणू सहजतेने पसरतो याबाबत पथकाला ठोस पुरावा मिळालेला नाही.

हे वाचा - राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

याबाबत लेखक ग्रीन हालाग म्हणाले, यापूर्वी काही कागदपत्रांमध्ये कमकुवत तथ्ये सादर केली गेली होती. परंतु आता हवेच्या माध्यमातून संसर्ग पसरत असल्याचे पुष्कळ पुरावे आहेत. त्यामुळे असा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात पावले उचलली गेली पाहिजेत.

काय आहे उपाय

या नव्या संशोधनात म्हटलं आहे की ड्रॉपलेटच्या माध्यमातून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हॅण्डवॉश, सरफेस क्लिनिंगसारखे उपाय योग्यच आहेत. परंतु आता त्यापेक्षा जास्त लक्ष हवेच्या माध्यमातून फैलावत असलेल्या संसर्गावर दिलं गेलं पाहिजे. जर एखादा संसर्गजन्य विषाणू हवेत असेल तर त्याचा संसर्ग झालेली व्यक्ती श्वास सोडणं, बोलणं, ओरडणं, गाणं म्हणणं किंवा शिंकणं या माध्यमातून विषाणू हवेत सोडते. आणि यामुळे श्वासोच्छवासाव्दारे दुसरी व्यक्ती संक्रमित होऊ शकते.

हे वाचा - कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार; मोदी सरकारने घेतले 2 मोठे निर्णय

हवेच्या माध्यमातून होणारे संक्रमण रोखण्यासाठी व्हेंटिलेशन, एअर फिल्ट्रेशनसारखे उपाय आहेत. गर्दीच्या ठिकाणी फार वेळ न थांबणं, कमीत कमी वेळ इनडोअर (Indoor) मध्ये थांबणे, इनडोअरमध्ये असताना सहा फुटांचं अंतर राखलं असलं तरीही मास्कचा वापर करणं, मास्कचा दर्जा आणि फिटींगकडे लक्ष देणं तसंच संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत राहताना दर्जेदार पीपीई किटचा (PPE Kit) वापर करणं या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

First published: April 16, 2021, 10:05 PM IST

ताज्या बातम्या