मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Coronavirus पासून वाचण्यासाठी वारंवार हँड सॅनिटायझर वापरताय, इतर आजारांना आमंत्रण देताय

Coronavirus पासून वाचण्यासाठी वारंवार हँड सॅनिटायझर वापरताय, इतर आजारांना आमंत्रण देताय

कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी हात स्वच्छ (hand cleaning) ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. घराबाहेर असताना हँड सॅनिटायझरशिवाय (hand sanitizer) पर्याय नाही, मात्र वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने इतर समस्या बळावू शकतात.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी हात स्वच्छ (hand cleaning) ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. या विषाणूचा (virus) धसका लोकांनी घेतला आहे, त्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी जी काही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, लोकं त्याची अंमलबजावणी करत आहेत. घरात असताना साबणानं हात धुणं ठिक आहे, मात्र घराबाहेर असताना हँड सॅनिटायझरशिवाय (hand sanitizer) पर्याय नाही आणि लोकं आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये या भीतीनं मिनिटामिनिटाला हँड सॅनिटायझर वापरत आहे.

सातत्याने हँड सॅनिटायझर वापरून तुम्ही कोरोनाव्हायरसपासून तर स्वत:चा बचाव करत आहात, मात्र अप्रत्यक्षरित्या इतर आजारांना तर निमंत्रण देत नाहीत ना?

संबंधित - तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव

हँड सॅनिटायझर म्हणजे त्यात केमिकल आलंच, त्यामुळे त्याचा अति वापर केल्यानं त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशिअन डॉ. गौतम भन्साली यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितलं की, "प्रत्येक वेळी हँड सॅनिटायझर वापरायला हवं असं नाही. हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्यानं स्किन इन्फेक्शन, स्किन अलर्जी होते. त्यामुळे काही कारण नसताना, गरज नसताना हँड सॅनिटायझर वापरू नका"

संबंधित - सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर नाही ना? शंका असल्यास 'या' चाचण्या करा

"सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, अशा व्यक्तींचं सामान उचलल्यास, गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवं. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत. शिवाय जेवणाच्या आधी आणि जेवणानंतरही तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता. मात्र वारंवार वापरणं चांगलं नाही", असा सल्ला डॉ. भन्साली यांनी दिला.

त्यामुळे तुम्हीदेखील कोरोनाच्या भीतीनं हँड सॅनिटायझर वापरत असाल, तर त्याचा वापर मर्यादित करा.

संबंधित - जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का?

First published:

Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus