मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था

मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था

फुफ्फुसांतील कोरोना संसर्गापेक्षाही (corona in lung) मेंदूतील कोरोना संसर्ग (corona in brain) अधिक जीवघेणा ठरत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.

फुफ्फुसांतील कोरोना संसर्गापेक्षाही (corona in lung) मेंदूतील कोरोना संसर्ग (corona in brain) अधिक जीवघेणा ठरत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.

फुफ्फुसांतील कोरोना संसर्गापेक्षाही (corona in lung) मेंदूतील कोरोना संसर्ग (corona in brain) अधिक जीवघेणा ठरत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.

मुंबई, 15 जानेवारी :  कोरोना विषाणूवरच्या (Corona Virus) लशी जगभरात ठिकठिकाणी तयार होत आहेत आणि त्यापूर्वीच एकंदर प्रसाराचा वेगही थोडा मंदावला आहे. त्यामुळे त्याविषयीची भीती थोडी कमी होत आहे. तरीही ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (New Strain) आढळल्याने चिंता पुन्हा वाढ झाली आहे.  ते कमी की काय म्हणून आता कोरोना विषाणू केवळ फुप्फुसांवरच नव्हे, तर मेंदूसह माणसाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (Central Nervous System) आघात करू शकतो, असं संशोधनात दिसून आलं आहे.

SARS-CoV-2 विषाणूवर अजूनही अभ्यास सुरू आहे. उंदीर आणि माणसाच्या मेंदूच्या पेशी आणि ऊतींवर (Tissues) नुकतेच काही प्रयोग करण्यात आले. त्यातून असं लक्षात आलं आहे की कोरोना विषाणू मेंदू आणि मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम करू शकतो. तिथं संसर्ग झाल्यास डोकेदुखी, चव आणि वास घेण्याची क्षमता नष्ट होणं, शुद्ध हरपणं, झटका येणं किंवा मेंदूत रक्तस्राव यांपैकी काहीही लक्षणं दिसू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. जर्नल ऑफ एक्स्परिमेंटल मेडिसीन या जर्नलमध्ये या संशोधनावरचा लेख प्रसिद्ध झाला आहे.

मानवी शरीरातल्या मूळपेशींपासून (Stem Cells) मानवी मेंदूतल्या अवययवांप्रमाणे छोटे थ्रीडी अवयव विकसित करण्यात आले. त्यांना ऑर्गनॉइड्स (Organoids) म्हणतात. त्यावर कोरोना विषाणूचा कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. या ऑर्गनॉइड्समधल्या न्यूरॉन्सवर (Neurons) हल्ला करण्याची कोरोना विषाणूची क्षमता असल्याचं यातून दिसून आलं. न्यूरॉन्समधल्या पेशींचा वापर करून कोरोना विषाणू स्वतःची संख्या वाढवत असल्याचंही दिसून आलं. संसर्ग झालेल्या पेशींचा चयापचयाचा (Metabolism) वेग वाढतो आणि संसर्ग न झालेल्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्या मरतात, असं प्रयोगात आढळलं.

हे वाचा - कोंबड्यांची टेस्ट निगेटिव्ह तरीही चिकन झालं कवडीमोल; फुकट विकण्याची आली वेळ 

कोरोना विषाणू फुप्फुसांच्या पेशीत प्रवेश करताना एसीईटू (ACE2) या नावाच्या प्रथिनाला चिकटून येतात. मानवी शरीरातलं एसीईटू हे प्रथिन तयार करू शकतील असे उंदीर जनुकीय सुधारित (Genetically Engineered) पद्धतीने विकसित करण्यात आले. या उंदरांच्या मेंदूमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकला. त्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये नाट्यमयरीत्या बदल झाले आणि मेंदूच्या ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला. उंदरांमध्ये फुप्फुसांपुरत्या मर्यादित असलेल्या कोरोनाच्या संसर्गापेक्षा मेंदूतला संसर्ग अधिक जीवघेणा होता, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

कोविड-19मुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन पेशंटच्या मेंदूचाही अभ्यास या शास्त्रज्ञांनी केला. त्यापैकी एका पेशंटच्या कॉर्टिकल न्यूरॉन्समध्ये कोरोना विषाणू आढळला. मेंदूच्या संसर्गित भागामध्ये ऊतींचा नाश झाला होता आणि पेशी मृत झाल्या होत्या. तसंच तिन्ही पेशंटच्या मेंदूविच्छेदनानंतर त्या तिघांच्याही मेंदूमध्ये छोटे व्रण असल्याचं आढळलं होतं.

हे वाचा - 15 दिवसांत रुग्णांचा आकडा शंभरी पार; भारतात आता UK तील कोरोनाला रोखण्याचं आव्हान

'विषाणू शरीरातल्या कुठल्या पेशींना, अवयवांना त्रास पोहोचवू शकतो, याचा अभ्यास करणं रुग्णावरील संभाव्य दीर्घकालीन त्रासांचा वेध घेण्यासाठी आणि त्यावरील उपचारपद्धती निश्चित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. हा विषाणू मज्जासंस्थेसाठी घातक ठरू शकतो, असं अभ्यासातून दिसून आलं आहे,' असं संशोधक आणि येल युनिव्हर्सिटीत प्राध्यापक अकिको इवासाकी यांनी सांगितलं.

ACE2 हे प्रथिन मेंदूच्या पेशींच्या पृष्ठभागावर उपस्थित असतं की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हे लक्षात आलं, की न्यूरॉन्सकडून हे प्रथिन तयार केलं जातं आणि या प्रथिनाला प्रतिबंध केल्यास कोरोना विषाणूंना ऑर्गनॉइड्समध्ये प्रवेश करता येत नाही.

First published:

Tags: Brain, Corona, Coronavirus, Health