मुंबई, 10 मार्च : कोरोना ओसरतो आहे असं चित्र असताना देशात केसेस वाढू लागल्या आहेत. मात्र रोजचं जगणं अर्थातच यामुळं पुन्हा लॉकडाऊनमध्ये टाकता येणार नाही. दैनंदिन आयुष्य जगताना अपरिहार्य झालेली एक गोष्ट म्हणजे मास्क. (Precaution at Gym)
मात्र अनेकांना सध्याच्या काळात प्रश्न पडतो आहे, की व्यायाम करताना, जिममध्ये असताना मास्क घालावा की नाही? हा प्रश्न अगदीच रास्त आहे. संशोधकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. (exercise and corona infection)
संशोधक म्हणतात, की खूप जोरदार व्यायाम करताना निरोगी लोकांनी मास्क घातला तर त्यांना काही अपाय होत नाही. कोव्हिडकाळात इनडोअर जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी मास्क घातला पाहिजे हेच यातून समोर येतं. (corona virus infection in gym)
युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार तिथल्या संशोधकांनी श्वसन, हृदयाची कार्यक्षमता आणि व्यायाम यांचं सखोल परिक्षण केलं. माणसांच्या एका लहानशा गटावर हे परिक्षण करण्यात आलं. हे लोक मास्क घालून आणि मास्क न घालता एक्सरसाईज बाईक चालवत होते तेव्हा त्यांचं परिक्षण करण्यात आलं. (wearing mask in indoor gym)
अर्थात या लोकांच्या मास्क घालून आणि न घातलेल्या अवस्थांमध्ये थोडाफार फरक दिसला. मात्र यातील कुठलाच रिझल्ट आरोग्याचा धोका दर्शवणारा नव्हता. हा अभ्यास इटलीतील मिलान इथल्या सेंट्रो कार्डिओलॉजिको मॉंझिनो डॉ. एलिसाबेट्टा सॅल्वीयोनी, डॉ. मासिमो मॅपेली यांच्यासह युनिव्हर्सिटी ऑफ मिलान इथले प्रोफेसर पिअरगुसेपे अगोस्टिनी यांनी केला. (using mask in gym research)
एलिसाबेट्टा सॅल्वीयोनी म्हणाले, 'कोरोनाव्हायरस मुख्यतः श्वासातील लहान लहान थेंबाद्वारे पसरतो. अशावेळी जिममध्ये व्यायाम करताना श्वास तीव्र होतात तेव्हा नक्कीच संसर्गाची भीती असते. विशेषतः इनडोअर जिममध्ये हे होऊ शकतं.'
हेही वाचा कोरोनाची लस घेताना या पोलिसाला आवरेचना हसू, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल हे काय
संशोधनात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांनी एक्सरसाईज बाईक वापरली तेव्हा संशोधकांनी त्यांचं श्वसन, हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी तपासली. अशावेळी मास्क घातलेल्या आणि न घातलेल्या अवस्थांमध्ये अगदी थोडासाच फरक दिसला. उदाहरणार्थ, एरोबिक पद्धतीचे व्यायाम करण्याच्या क्षमतेत केवळ १० टक्के सरासरी फरक पडला.
हेही वाचा महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS
परिणाम दर्शवतात, की हा फरकही मास्कमधून या लोकांना श्वासोच्छवास करण्यास अगदी थोडासा त्रास झाल्यामुळं पडला होता. संशोधकांची ही टीम आता रोजच्या जगण्यातल्या पायऱ्या चढणे, घरकाम करणे अशा गोष्टी करताना मास्क घातल्यानं काय फरक पडतो हे अभ्यासत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Covid19, Mask, Research, Safety, Yoga