अरे देवा! आता न्यूयॉर्कमध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन; लशीच्या क्षमतेवरही करू शकतो परिणाम

अरे देवा! आता न्यूयॉर्कमध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन; लशीच्या क्षमतेवरही करू शकतो परिणाम

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून 12 टक्के नमुन्यांमध्ये न्यूयॉर्कमधील हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 फेब्रुवारी :  ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता न्यूयॉर्कमध्येही (New york) कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona new strain) दिसून आला आहे. अमेरिकेतील दोन गटांच्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्र अभ्यास केला आणि या दोन्ही संशोधनात न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा हा नवा म्युटेट व्हेरिएंट (Mutate Varient) असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सावध राहण्याच्या आणि खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट गेल्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क परिसरात आढळून आला होता. त्यानंतर शेजारील राज्यांमध्ये त्याचा वेगाने प्रसार झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजीच्या संशोधकांनी या आठवड्यात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

न्यूयॉर्कमधील कॅलटेक आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील दोन संशोधक गटांनी या आठवड्यात पेपर प्रसिद्ध केले असून, त्यात त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत, त्याच्या निष्कर्षाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कॅलटेकच्या संशोधकांनी या महिन्यात पाहाणी केलेल्या 1200 विषाणू सिक्वेन्सेसमध्ये एक चतुर्थांश विषाणू हे नवीन रुपात आढळून आले आहेत. न्यूजर्सी आणि आसपासच्या भागात हा विषाणू आढळून आला असून देशभरातही त्याचे व्हेरिएंट दिसून आले आहेत, असे पेपरचे सह-लेखक कॅलटेक अंथोनी वेस्ट यांनी सांगितलं.

हे वाचा - राज्यांतील कोरोनाचा प्रकोप पाहता केंद्रानं घेतला आणखी एक निर्णय; नवा आदेश जारी

गुरुवारी कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांचं संशोधन जाहीर केलं. यासाठी विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रात गेल्या नोव्हेंबरपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून 1100 विषाणू नमुने घेत त्यांची छाननी करण्यात आली. साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून 12 टक्के नमुन्यांमध्ये नवा व्हेरिएंट आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या पेशंटसना म्युटेट विषाणूचा संसर्ग झाला आहे, त्यांच्यात विषाणूचं प्रमाण अधिक असून त्यांना रुग्णालयात भरती करावं लागलं आहे.

या नवीन व्हेरिएंटमुळे लशींची कार्यक्षमता कमकुवत होऊ शकते, असं दोन्ही गटांनी नमूद केले. सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी आम्ही याकडे लक्ष ठेवून असल्याचे बॉलॉक्स म्हणाले. कोणताही विषाणू जेव्हा पसरतो तेव्हा तो म्युटेट किंवा त्यांच्या अनुवंशिक संहितेत सतत बदल घडवत त्याच्या कॉपीज तयार करत असतो. परंतु हे करत असताना बहुतांश वेळा विषाणू एकसुसगंत राहत नसल्याचे युनिव्हर्सिटी कॉलेज आफ लंडन जेनेटिक्स संस्थेचे संचालक फ्रॅंकोईस बॉलॉक्स यांनी सांगितलं. पण हे बदल चिंताजनकही असू शकतात असे ते म्हणाले.

तिथं अन्य किती व्हेरिएंटस आहेत?

या संपूर्ण महासाथीमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले असून त्यापैकी 3 व्हेरिएंट अधिक चिंताजनक मानले जात आहेत. त्यांचे परिणाम देखील तसेच दिसून आले आहेत. हे व्हेरिएंट प्रथम ब्रिटन (Britain), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ब्राझीलमध्ये (Brazil) आढळून आले आणि त्यानंतर अन्य देशांमध्ये त्यांचा प्रसार झाला.

आजार नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या म्हणण्यानुसार, गेल्यावर्षी आढळलेला यूके व्हेरिएंट अमेरिकेतील 45 राज्यांमध्ये दिसून आला आहे. स्ट्रेनचा विचार करता या कोरोना विषाणूचे 24 वेळा म्युटेशन झालं आहे. काही विषाणू पेशींना संक्रमित करत असून, सद्यःस्थितीत ते लस आणि अॅण्टीबॉडीज औषधांना लक्ष करीत आहेत. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरुवातीच्या काळात आढळून आलेला व्हेरिएंटस आणि आता न्यूयॉर्कमध्ये आढळलेल्या नवा व्हेरिएंटसमध्ये स्पाईक प्रोटिन म्युटेशन असल्याचं दिसून आलं आहे.

हे वाचा - कोरोनाचा उद्रेक होत असतानाच लसीकरणाला मोदी सरकारकडून ब्रेक; दिलं 'हे' कारण

त्याचप्रमाणे कॅलिफोर्नियामध्ये (California) प्रसार होत असलेल्या व्हेरिएंटकडेही आता लक्ष दिलं जात आहे. संचालक बार्बरा फेरेर यांनी सांगितलं की लॉस एंजेल्स सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मोजणी विभागाने तपासणी केलेल्या 40 ते 50 टक्के नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. या म्युटेशनचा काय परिणाम होऊ शकतो, हे ठरवण्यासाठी पुरेसे सखोल संशोधन अद्याप झालेलं नाही.

यापुढे काय?

फेडरल सरकारने अलिकडच्या आठवड्यांमध्ये या विषाणूचे रुपांतर शोधण्यासाठी जेनेटिक सिक्वेन्सवर भर दिला असून त्यामुळे कोणती समस्या उदभवू शकते, हे स्पष्ट केलं आहे. दरम्यान माऊंट सिनाईस इकॉन स्कूल आॅफ मेडिसीनच्या विषाणू विज्ञान तज्ज्ञ अॅना एस गोंजालेझ रेशे यांनी याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय प्रत्येक व्हेरिएंटबाबत इशारा देण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - देशातला निम्मा कोरोना महाराष्ट्रात; Covid-19 चा भयानक रिपोर्ट सादर

सुरुवातीला आलेली कोरोनाची लस (Corona Vaccine) ही दक्षिण आफ्रिकेत प्रथम उद्भवलेल्या व्हेरिएंटला लागू पडत नसल्याची चिंता अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. यावर औषध कंपन्यांनी लशीमध्ये कशी सुधारणा करायची यावर आधीच संशोधन सुरू केलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि मास्कचा (Mask) वापर यांसारख्या सार्वजनिक आरोग्य उपायांनी कोरोनाचे म्युटेशन आणि प्रसार यावर नियंत्रण आणता येईल.

Published by: Priya Lad
First published: February 27, 2021, 11:16 AM IST

ताज्या बातम्या