मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mosquito Diseases: मच्छरांना हलक्यात घेऊ नका; डास चावल्यावर होऊ शकतात 'हे' आजार

Mosquito Diseases: मच्छरांना हलक्यात घेऊ नका; डास चावल्यावर होऊ शकतात 'हे' आजार

एक मच्छर...  जिंदगी ले सकता है! पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी डासांचं प्रमाण वाढलं आहे. किती भीषण आहे यामुळे पसरणाऱ्या रोगांचं वास्तव वाचा...

  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 8 सप्टेंबर : कोरोनामुळे अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. अजूनही कोरोना (Corona) कहर थांबलेला नाही, त्यामुळे आता कोरोनाबरोबर काही इतर आजारांनीही लोकं हैराण झाली आहेत. पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी मच्छरांचे प्रमाण वाढले आहे, मच्छरांच्या चावण्यामुळे (Mosquito Diseases) आता लोकं आजारी पडत आहे. त्यामुळे मच्छरांना हलक्यात घेण्याची चूक करू नका. मच्छर चावल्यानंतर सुरूवातीला ताप आणि नंतर आजार हा अशा पद्धतीचे काही आजार असल्याने काही कळायच्या आतच व्यक्तीला डेंग्यू (Symptoms Of Dengue) होत आहे. हे आजार केवळ मच्छरांमुळेच होतात. डेंग्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. जो मच्छर चावल्यानंतर होतो.

डासांमुळे होणारे दुष्परिणाम

दरवर्षी भारतात डेंग्यूचे 9.6 कोटी प्रकरण समोर येतात, यातल्या जवळपास 40 हजार लोकांचा मृत्यू होतो. एका सर्वेक्षणानुसार इतर रोगांच्या तुलनेत मच्छरांमुळे अधिक लोकांचा मृत्यू होतो. या सर्वेक्षणात जेव्हा लोकांना विचारण्यात आले की तुमच्या भागात मच्छर होऊ नये म्हणून फवारा मारण्यात आला आहे की नाही तर त्यातल्या 37 टक्के लोकांनी याचे नकारात्मक उत्तर दिले आहे.

जाणकारांच्या मते 17 टक्के लोकांचा मृत्यू हा केवळ किटकाच्या दंशामुळे होतो.

तुम्हालाही सतावतेय मुलांच्या उंचीची चिंता? मग करा 'हे' उपाय

त्यामुळे जगभरात वार्षिक 7 लाख लोकांचा बळी जातो. त्यात लहान मुलांचेही प्रमाण लक्षणीय असते. आता आधीच कोरोनाचा कहर सुरू असताना अशा पद्धतीने आता डासांचाही कहर सुरू झाला आहे. आणि विषेश म्हणजे सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आता अजून संसर्गजन्य रोग होण्याची भीती आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Health, Health Tips