Home /News /lifestyle /

Corona काळात आपण खोटं बोलायलाही शिकलो का? साथीने बनवलंय अप्रामाणिक - Survey

Corona काळात आपण खोटं बोलायलाही शिकलो का? साथीने बनवलंय अप्रामाणिक - Survey

राज्य स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागल्या त्यामुळे कोविड रुग्णांवर तातडीने उपचार केले गेले.

राज्य स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागल्या त्यामुळे कोविड रुग्णांवर तातडीने उपचार केले गेले.

खोटं बोलणं हा सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्याचं मानलं जातं. पण तरीही या सर्व्हेमध्ये असं दिसलं की, Covid काळात लोक जास्त प्रमाणात खोटं बोलायला लागली आहेत. लपवाछपवी वाढली आहे. काय आहेत कारणं?

    नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : जगात खोटं बोलणारी लोक असतात. म्हणजे सगळीकडचीच माणसं खोटं बोलतात. पण किती आणि कधी यावरून समाजाची मानसिक स्थिती समजू शकते. 1996 मधील अभ्यासानुसार सर्वसाधारणपणे लोक दिवसातून एक किंंवा दोनदा खोटं बोलतात. मात्र, Coronavirus च्या या संकटात खोटं बोलण्याचं प्रमाणही वाढलं आहे, असा निष्कर्ष अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. Unlock चा काळ सुरू झाल्यानंतर जनजीवन सुरळीत होतंय असं वाटत असतानाच खोटं बोलण्याचं प्रमण वाढलं आहे. माणूस दिवसातून एक किंवा दोनदा खोटं बोलतात. खोटं बोलणं हा सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्याचं मानलं जातं. मात्र या अभ्यासात सहभागींचे म्हणणे आहे की, हे असं खोटं बोलणं क्षुल्लक आहे. ते खोटं बोलणं वाढल्याची चिंताही करीत नाहीत आणि ते गांभीर्यानेही घेत नाहीत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मात्र, साथीच्या वेळी खोटं बोलण्यामुळे covid-19 चा संसर्ग अधिक फोफावतो आहे. शिवाय आर्थिक संकटंही वाढत आहेत. खोटं बोलल्याने त्याचे परिणाम काय होतात, याची काही उदाहरणंही सर्व्हेमध्ये समोर आली आहेत. मार्च महिन्यात न्यूयॉर्कमधील एक व्यक्ती त्याच्या कोविडच्या लक्षणांबाबत खोटं बोलली. त्याच्या पत्नीला बघायला तो प्रसूती कक्षात गेला. त्याच महिन्यात एका महिलेने लक्षणं लपविली आणि तिला लक्षणं असल्याचं समोर आल्यानंतर ती खोटं बोलत असल्याचं उघड झाले. वॉशिंग्टन येथील एक महिला आधी खोटं बोलली आणि नंतर ती बाधित आल्याने तिला पश्चाताप झाला. नुकत्याच अमेरिकेत ब्रोक विद्यापीठाच्या अभ्यासानुसार 20 ते 82 वर्षापर्यंतच्या 451 लोकांची चाचणी झाली. ज्या लोकांना संसर्गाची माहिती असते ते नेहमी प्रामाणिक नसतात, असा निष्कर्ष यावरून काढण्यात आला. 34 टक्के बाधित रुग्णांनी लक्षणे नाकारली होती आणि 55 टक्के लोकांना कमी अधिक लक्षणं होती. आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते, हे 25 टक्के लोकांनी लपविलं. त्यामुळे संसर्गाचं प्रचंड वाढलं. हा अभ्यास जनरल हेल्थ आॅफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, वृद्ध, प्रौढ हे त्यांच्या लक्षणांच्या बाबतीत अधिक प्रामाणिक असतात. साथीच्या काळात खोटं बोलणं हे अत्यंत धोकादायक असतं आणि ते वातावरणावर अवलंबून असतं. मानसोपचारतज्ज्ञ डेव्हीड कॅस्ट्रो हे अॅडेलफी विद्यापीठात न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या खूप एकाकीपणा असल्याने लोकांमध्ये नैराश्य आहे. सध्याचं सामाजिक जीवन लोकांना आवश्यक गोष्टी पुरवू शकत नाही. 'द लायर इन युवर लाईफ'चे लेखक आणि प्राध्यापक रॉबर्ट फेडलमॅन म्हणतात, एक व्यक्ती पहिल्या दहा मिनिटात तीन वेळा खोटं बोलतो. मात्र, या महामारीत प्रामाणिक असणे, मास्क घालणे, घरी राहणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हे अत्यावश्यक आहे. मात्र, तणावामुळे लोक पूर्णत: प्रामाणिक नसतात. आपलं वैयक्तिक आरोग्य असल्यानं लोक खोटं बोलत राहतात. लोकांना सांगितलं गेलं पाहिजे की, दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिक राहा, हे खूप कठीण असते. कारण त्यात तत्त्वांचा विषय असतो. महिन्याभराच्या लॉकडाऊननंतर आपण स्वतंत्र आहोत, असं वाटतं. कारण तुम्ही स्वत:ला सांगता की तुम्ही संघर्ष केला आहे. जे सुरू आहे ते कधी संपेल हे स्पष्ट नाही, ते अनिश्चित आहे आणि हेच प्रसंग आपल्याला अप्रामाणिक बनवत असतात.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या