नवी दिल्ली, 28 डिसेंबर : जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग वेगाने पसरतो आहे. त्यातच युरोपीय देशात कोरोनाचे नवे रुप दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि आता कोरोनाच्या संसर्गामुळे नव्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. कोरोना विषाणूमुळे माणसांना न्युमोथोरेक्स (Pnumothorax) हा आजार होऊ शकतो. कोरोनामुळे होणाऱ्या या आजारात रुग्णाची फुफ्फुसं अत्यंत कमकुवत होऊन त्याला छेद जाऊ लागतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यावर काही ठोस इलाज नसल्यानं संशोधक चिंतेत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गामुळे रुग्णांच्या फुफ्फुसात फायब्रोसिस (Fibrosis) झाल्याचं दिसून येत आहे. याचाच अर्थ फुफ्फुसाच्या (Lungs) ज्या भागातून हवा बाहेर पडते, तिथं म्युकसचं जाळे तयार होतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा फायब्रोसिसमध्ये वाढ होते, तेव्हा फुफ्फुसाला छेद जाण्यास सुरुवात होते.
गुजरातमधील (Gujrat) काही कोरोनाग्रस्तांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. हे सर्व रुग्ण 3 ते 4 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झाले होते, मात्र त्यानंतर या रुग्णांमधून फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची तक्रार येऊ लागली.
हे वाचा - Coronavirus पेक्षा गंभीर समस्यांना तयार राहा, WHO च्या प्रमुखांचा इशारा!
या रुग्णांना छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोनामुळे तयार झालेले फायब्रोसिस जेव्हा फाटू लागतात तेव्हा फुफ्फुसात न्युमोथेरोक्सला सुरुवात होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, न्युमोथेरोक्समध्ये फुफ्फुसाच्या बाहेरील चारही बाजू आणि अंतर्गत भाग इतका कमकुवत होतो की त्याची ते बरे होण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये छेद पडायला सुरुवात होते.
हे वाचा - कोरोनाच्या अँटीबॉडीजबाबत खुशखबर, वाचा काय म्हणतंय नवं संशोधन
न्युमोथोरेक्सच्या रुग्णांना छातीत तीव्र वेदना (Cheast Pain), श्वास घेण्यात अडथळे, छातीत जडपणा जाणवणे आणि अपचन यांसारख्या समस्या जाणवतात. फायोब्रोसिसमुळे फुफ्फुसांची नवी लेअर एवढी कमकुवत होते की ती हिलींगच्या (Healing) दरम्यान फाटू लागते. यावर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर प्रसंगी रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus