देशांतर्गत विमान प्रवासाचे बदलले नियम; मास्क घातला नाही तर...

देशांतर्गत विमान प्रवासाचे बदलले नियम; मास्क घातला नाही तर...

फ्लाइटमध्ये दिलं जाणारं जेवण, नाश्ता, चहा-कॉफी इत्यादी पेयं ही सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती. आता ती सुरू होईल पण, नवे नियम असतील अधिक कडक. कोणते? वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : Coronavirus मुळे सुरू असलेला Lockdown चा पहिला टप्पा संपल्यानंतर मे महिन्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. Covid-19 चा धोका कायम असल्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर हे नियम कायम ठेवत काही नवी नियमावली आता Doemstic Airlines नी जाहीर केली आहे. विमानप्रवासात खाण्या-पिण्याच्या पदार्थांची सेवा बंद होती. ती सुरू होणार आहे. पण त्याचवेळी मास्क न लावणाऱ्यांविरोधातली कारवाई कडक केली जाणार आहे.

फ्लाइटमध्ये दिलं जाणारं जेवण, नाश्ता, चहा-कॉफी इत्यादी पेयं ही सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा त्यामागे हेतू होता. आता नवीन नियमांनुसार एअरलाईन्स पूर्वीप्रमाणे ऑन फ्लाइट खान पान सेवा सुरू करू शकतात. पण प्रत्येक वेळी खाण्याचे पदार्थ सर्व्ह करताना केबिन क्रूला नवे हातमोजे घालावे लागणार आहेत. डिस्पोजेबल कटलरी वापरणं बंधनकारक असेल. प्रत्येक वेळी खाण्याचा ट्रे सॅनिटाईझ करून घ्यावा लागेल.

खाण्याची सेवा सुरू करण्याआधी उद्घोषणा करत प्रवाशांना याची पूर्वकल्पना देणं आवश्यक असणार आहे. केबिन क्रूसाठी हे नियम आहेत, तसे प्रवाशांसाठीही काही गोष्टी बंधनकारक ठेवण्यात आल्या आहेत.

मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. एखाद्या प्रवाशाने मास्क लावण्यास नकार दिला तर त्याच्यावर हवाई प्रवासासाठी कायमची बंदी घालण्यात येऊ शकते.

डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे देण्यात आलेल्या नव्या SOP मध्ये या नियमाचा उल्लेख आहे. मास्क न लावणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये (no-fly list) घातलं जाईल आणि त्यांच्या विमान प्रवाासावर प्रतिबंध येतील.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 28, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या