मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'वर्क फ्रॉम होम'बाबत महत्त्वपूर्ण सर्व्हे आला समोर, तब्बल 'इतक्या' टक्के लोकांना वाटतं आता ऑफिसच गाठावं!

'वर्क फ्रॉम होम'बाबत महत्त्वपूर्ण सर्व्हे आला समोर, तब्बल 'इतक्या' टक्के लोकांना वाटतं आता ऑफिसच गाठावं!

न्यूज 18ने मार्केट रिसर्च कंपनी यूगोव्ह (Yougov) या कंपनीसमवेत नुकताच एक सर्व्हे (Survey) केला. त्यात बऱ्याच लोकांचा गट आता कार्यालयातून कामकाज करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले.

न्यूज 18ने मार्केट रिसर्च कंपनी यूगोव्ह (Yougov) या कंपनीसमवेत नुकताच एक सर्व्हे (Survey) केला. त्यात बऱ्याच लोकांचा गट आता कार्यालयातून कामकाज करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले.

न्यूज 18ने मार्केट रिसर्च कंपनी यूगोव्ह (Yougov) या कंपनीसमवेत नुकताच एक सर्व्हे (Survey) केला. त्यात बऱ्याच लोकांचा गट आता कार्यालयातून कामकाज करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले.

  नवी दिल्ली, 9 जानेवारी : कोरोना (Corona) महामारीने आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व बाबींमध्ये बदल घडून आणला आहे. रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होमला (Work From Home) दिले गेलेले प्राधन्य हे शहाणपणाचे लक्षण ठरले. परंतु, जवळपास संपूर्ण वर्ष चार भिंतीच्या आत काम करणं अनेकांसाठी कंटाळवाणं ठरत आहे.

  बऱ्याच कंपन्यांचे कामकाज आता पूर्वपदावर येत असून, त्यांचे कामगार नियमित कार्यालयात येऊ लागले आहेत. आरोग्य व्यावसायिक,कायदा आणिसुव्यवस्था अधिकारी, अन्न पुरवठा करणारे व्यावसायिक यांच्यासह ज्यांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना कधीच व्यवहार्य ठरु शकणारी नव्हती, असे लोक आता पुन्हा आपल्या वर्कींग चेंबर्समध्ये परतण्यास उत्सुक दिसत आहेत.

  याबाबत न्यूज 18ने मार्केट रिसर्च कंपनी यूगोव्ह (Yougov) या कंपनीसमवेत नुकताच एक सर्व्हे (Survey) केला. त्यात बऱ्याच लोकांचा गट आता कार्यालयातून कामकाज करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले. तसेच काही लोक सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही अशा कामकाजास प्राधान्य देण्यास तयार नसून, आम्ही लसीची वाट पाहत आहोत असे त्यांचे म्हणणे आहे.

  29 डिसेंबर 2020 ते 3 जानेवारी 2021 दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत शहरी भागातील (Urban Area) 1015 लोकांकडून डेटा जमा करण्यात आला. यातून कामावर परत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांविषयी काही मनोरंजक माहिती पुढे आली आहे.

  यात 10 पैकी 7 लोकांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली असून ते कार्यालयातून काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले. तसेच 67 टक्के लोक कार्यालयात परतणार या कल्पनेने सुखावले आहेत. या सर्व्हेतील एक तृतीयांश लोकांनी, जेव्हा सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण होईल तेव्हाच आम्ही ऑफिसमधून कामकाज सुरु करु असे सांगितले. तथापि, या सर्व्हेच्या निष्कर्षातील एक मनोरंजक अनुमान असे होते की जवळपास 30 टक्के सहभागी लोकांनी त्यांच्या कार्यालयातील अन्य लोकांनी लस घेतल्यावर आम्हाला ऑफिसमधून काम करण्यास कोणतीही अडचण नाही, असं सांगितलं. म्हणजेच ऑफिसमधील जागांची स्वच्छता करण्यात आली, सहकारी कामगारांचे लसीकरण केले तर काम करताना कोणताही धोका राहणार नाही असे सर्व्हेतील सहभागींना वाटते.

  आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

  दरम्यान अनेक जणांना वर्क फ्रॉम होमची सवय झाली आहे. त्यातील 20 टक्के लोकांना जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत वर्क फ्रॉम होम हेच अधिक सोयीस्कर आहे असे वाटते. मग भलेही सर्वांचे लसीकरण झाले किंवा नाही झाले तरी चालेल.

  या नव्या वर्षात चांगल्या रोजगार संधी उपलब्ध होतील असं 48 टक्के सहभागींना वाटते तर 32 टक्के सहभागींना येत्या वर्षातील रोजगारसंधींबाबत खात्री वाटत नाही. दूरस्थपणे काम करणे हे जरी आपण यापूर्वी आपण अनुभवलेले किंवा ऐकलेले नसेल तरी कोरोनाचा संसर्ग रोखणारा हा एक प्रमुख घटक आहे. साथीचे यानंतरचे स्वरुप कसे असेल, लसीकरणानंतरची स्थिती कशी असेल, यावर बहुतांश कंपन्यांची कार्यनिती अवलंबून असणार आहे.

  प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) यापूर्वीच दूरस्थ कामासाठी (Remote Work) मुदतवाढ घोषित केली आहे. कंपनीने नवीन हायब्रीड वर्कप्लेस मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याद्वारे कामगारांना दूरस्थ काम करताना लवचिक नियोजन कसे करता येईल आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अन्यत्र ठिकाणी स्थानांतरीत केले जाऊ शकेल हे सांगण्यात आले आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक चांगल्या आणि नवीन कल्पना आणल्या आहेत. महामारीच्या काळात कामगारांना अधिक त्रास होऊ नये यासाठी आणखी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गुगलने (Google) पूर्णवेळ कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांसाठी एक दिवस पगारी सुट्टी तसेच शुक्रवारीदेखील सुट्टी जाहीर केली आहे.

  बर्फात अडकली अँब्युलन्स; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काय केलं; पाहा VIDEO

  गेल्यावर्षीच्या सर्व्हेच्या अहवालात असे दिसून आले की कामकाज आणि वैयक्तिक जीवन यातील पुसटशा सीमारेषेमुळे भारतातील 41 टक्क्यांपेक्षा जास्त कामगार हे ताणतणावाच्या (Stress) पातळीवर काम करीत आहेत. ही पुसटशी सीमारेषा हा सहकाऱ्यांशी वारंवार होणाऱ्या संवादाचा परिणाम आहे तर मर्यादा ही दीर्घकाळ कामकाजाचा परिणाम आहे.

  कोरोनामुळे वाढलेला ताणतणाव,वैयक्तिक जीवनातील संमिश्र घटनांमुळे पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन कामकाज करणे अनेक लोकांना आवश्यक वाटते.

  First published: