17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सीरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. सीरो सर्व्हेच्या आकडेवारीनुसार झोपडपट्टी परिसरात 15.6% लोकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज सापडल्यात. झोपडपट्टी नसलेल्या परिसरात हे प्रमाण 8.2% आहे तर ग्रामीण भागात 4.4% आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस आपले हातपाय पसरतो आहे. मात्र त्याची कल्पनाही कुणाला नाही.Urban slums (15.6 pc), non-slum (8.2 pc) areas have higher SARS-COV2 prevalence than in rural areas (4.4 pc): ICMR second sero-survey
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2020
नवी दिल्ली आणि मुंबई या भारतातील सर्वात मोठ्या दोन शहरांमध्ये कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या शहरांमध्ये असलेल्या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने साथ सगळीकडे पसरली. या ठिकाणी असलेल्या दाट लोकवस्तीच्या घरांमुळे लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास अडचण निर्माण होत होती. सोशल डिस्टन्सिंग राखणं या भागात अशक्य असतं. सीरो सर्व्हेबाबत या दोन शहरांची तुलना केली असता, दिल्लीपेक्षाही मुंबईतील परिस्थिती किती चिंताजनक आहे, याचा अंदाजा येईल. हे वाचा - कोरोनाचा धोका कायम; दिल्लीच्या दुसऱ्या टप्प्यातील सीरो सर्व्हेतून आली धक्कादायक जून आणि जुलै महिन्यातील दिल्ली आणि मुंबईची तुलना करता दिल्लीत 27 जून ते 10 जुलै 21387 नमुन्यांची आणि मुंबईत 29 जून ते 19 जुलै 6,936 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. दिल्लीपेक्षा मुंबईतील नमुने कमी असले तरी दिल्लीत 23.5% लोकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्यात. पण मुंबईत झोपडपट्टी परिसरात तब्बल 57.8% आणि झोपडपट्टी नसलेल्या भागात 17.4% लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्यात. या आकड्यांवरून दिल्लीपेक्षा मुंबईची परिस्थिती किती भीषण परिस्थिती आहे हे दिसून येतं. हे वाचा - लवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला ही आकडेवारी यासाठी महत्त्वाची आहे. कारण प्रत्यक्षात कोरोनाची जी आकडेवारी सरकार जारी करतं आहे, त्यापेक्षा किती तरी अधिक लोकांना कोरोना आधीच झालेला आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणं नाही आणि अप्रत्यक्षरित्या कोरोना पसरतो आहे.Second #COVID19 sero-survey shows one in 15 individuals aged ≥ 10 years was estimated to be exposed to COVID by August. Head of COVID Task Force, Dr. VK Paul tells @ShereenBhan, "Pandemic is now of a bigger magnitude than 4 weeks ago." pic.twitter.com/uz4Sh8HqzE
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) September 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus