कोरोना काळात घरबसल्या 'हे' व्यायाम करा आणि निरोगी राहा

कोरोना काळात घरबसल्या 'हे' व्यायाम करा आणि निरोगी राहा

कोरोना काळात घरच्या घरीच स्वत:ला तंदुस्त ठेवण्यासाठी काही खास व्यायाम.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : कोरोनाच्या या महासंकटकाळात सगळेच जण घरी आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या जीम हळूहळू पूर्ववत होत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांना आणखीन तंदुरुस्त राहण्यासाठी घरच्या घरीच काही खास व्यायम केल्यानं देखील आराम मिळू शकतो आणि आपलं स्वास्थ उत्तम राहू शकतं.

शरीर फिट असेल तर तुमचं मानसिक आरोग्यदेखील फिट राहील. त्यामुळे तुमचं आरोग्य नीट राहून कोरोनापासून संरक्षण करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. कोरोनामुळे सध्या जीम बंद आहेत. त्यामुळे घरच्याघरी तुम्ही काही व्यायाम प्रकार करू शकता. असे कोणते व्यायाम प्रकार आहेत जे घरच्या घरी करूनही आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं जाणून घेऊया.

1) Skipping

सकाळ-संध्याकाळ दोन वेळा 10 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्या तर साधारण 200 कॅलरी जळतात. एक तास दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे सरासरी 700 हून अधिक कॅलरीज जळतात. त्यामुळं तुमच्या शरीरातून घाम निथळत नाही तोपर्यंत तुम्ही दोरीउड्या मारू शकता.

2) Burpees

हा व्यायाम प्रकार म्हणजे एकप्रकारच्या उठाबशा आहेत. त्याचबरोबर जवळपास स्क्वाटसारखा हा व्यायाम असून याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या शरीरातील चरबी कमी करू शकता.

हे वाचा-वयाच्या 26व्या वर्षी हृदय विकाराचा धक्का; तुम्हालाही आहे का 'ही' सवय

3) Push-Ups

घरात करण्यासाठी हा व्यायाम अतिशय सोपा आहे. कमी जागेतदेखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. पुश अप्स हा अतिशय सोपा व्यायाम असून 10 मिनिटांच्या व्यायामाने तुम्हाला खूप शक्ती मिळते.

4) Planks

पोटासाठी हा व्यायाम अतिशय उपयोगी आहे. फॅट्स कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवून तुम्ही केवळ हातांच्या मदतीनं शरीरवर घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा हा व्यायाम केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो.

हे वाचा-वजन कमी करण्यापासून मानसिक आरोग्यासाठी उपयोगी आहे अक्रोड,वाचा 5 महत्त्वाचे फायदे

5) Bicycle crunch

बाइसिकल क्रंचचा तुमच्या पूर्ण स्नायूंचा व्यायाम होतो. अब्स तयार करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. फॅट्स कमी होऊन अब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो. घरबसल्या देखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. या प्रकारामध्ये बेसिक क्रंच, रिव्हर्स क्रंच, डबल क्रंच असे तीन प्रकार असतात. ज्याप्रकारे आपण सायकल चालवण्यासाठी पाय वरखाली करतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपून आपण हा व्यायाम करू शकतो.

6) Squatting

ज्या पद्धतीने अब्ज तयार करण्यासाठी Bicycle crunch हा व्यायाम केला जातो. त्याच पद्धतीने शरीराच्या मागील भागासाठी स्क्वाट हा व्यायाम केला जातो.हा उठा बशांचाच प्रकार आहे. पायासाठी देखील उत्तम व्यायाम आहे. उठाबशा मारण्याबरोबरच तुम्ही मध्ये उड्यादेखील मारू शकता.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 29, 2020, 7:53 AM IST

ताज्या बातम्या