Covid-19 Vaccine: मोफत लशीचे पैसे येणार कुठून? कंडोम बनवणाऱ्या कंपनीची लसीकरणातली भूमिका स्पष्ट

Covid-19 Vaccine: मोफत लशीचे पैसे येणार कुठून? कंडोम बनवणाऱ्या कंपनीची लसीकरणातली भूमिका स्पष्ट

मोदी सरकारने पहिल्या टप्प्यातलं लसीकरण (Corona Vaccine) मोफत होईल असं सांगितलं आहे. त्यामागे काय गणित आहे हे समजून घेण्यासाठी लसनिर्मितीच्या पुढची प्रक्रिया मुळातून समजून घ्यायला हवी.

  • Share this:

स्नेहा मोरदानी

नवी दिल्ली, 12 जानेवारी: भारतात कोरोना लसीकरणाची (Corona vaccination) तयारी सुरू आहे. 16 जानेवारीला लसीकरण (covid 19 vaccination) सुरू केलं जाणार आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवातही करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं लस उत्पादक कंपन्यांशी करार करून लशीचे डोसही खरेदी केले आहेत. भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट(SII) बरोबर सरकारने करार केला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड (Covishield) या दोन लशी आहेत. मोदी सरकारने पहिल्या टप्प्यातलं लसीकरण मोफत होईल असं सांगितलं आहे. त्यामागे काय गणित आहे हे समजून घेण्यासाठी लसनिर्मितीच्या पुढची प्रक्रिया मुळातून समजून घ्यायला हवी.

केंद्र सरकारने या दोन लसींच्या तात्काळ वापराला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता सरकारने या दोन लसींच्या खरेदीच्या ऑर्डर देखील या कंपन्यांना दिले आहेत. भारत बायोटेकच्या 55 लाख डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. तर आज सीरमच्या लसीची पहिली खेप अनेक शहरांमध्ये वितरित करण्यात आली असून लवकरच लसीकरण सुरु होणार आहे.  न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, सिरम  इंस्टिट्यूट ऑफ इंडिया(SII) सरकारला साडेचार कोटी डोस देणार आहे. एक 1 कोटी 10 लाख डोस हे पहिल्या टप्प्यात देण्यात असून असून भारत बायोटेककडून देखील लवकरच 55 लाख डोस देण्यात येणार आहेत. एकूण 1 कोटी डोसची ऑर्डर भारत बायोटेकला देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 38.5 लाख तर दुसऱ्या टप्प्यात 16.5 लाख आणि त्यानंतर आणखी 45 लाख डोस देण्यात येणार आहेत. लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाईल. ज्याची सर्वसाधारण संख्या तब्बल 3 कोटी आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकनं(Bharat Biotech) तयार केलेली ही स्वदेशी लस. या लशीचा एका डोस 295 रुपयांना आहे. टॅक्स वगैरे धरून ही किंमत जवळपास 309 रुपयांपर्यंत आहे. याचबरोबर कोविशिल्ड लशीच्या एका डोसची किंमत 220 रुपये आहे.  ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Pune Serum Institute of India) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार  केली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. किंवा पंतप्रधान मदत निधीमधून याचा खर्च केला जाणार आहे. यासाठी राज्यांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार करत असल्याने या दोन्ही कंपन्यांना काही डोस मोफत देण्याचे आवाहन सरकारने केलं आहे. यामध्ये भारत बायोटेकने सहमती दर्शवली असून सीरम बरोबर सरकारची बोलणी सुरू आहेत.

HLL करणार लस खरेदी

  या लस खरेदीची जबाबदारी केंद्र सरकरने हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड (HLL) या कंडोम तयार करणाऱ्या कंपनीला दिली आहे. या कंपनीने 1970 च्या दशकात मोठ्या प्रमाणात कंडोमची  होती. याचबरोबर कुटुंब नियोजन अभियानामध्ये देखील कंपनीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

First published: January 12, 2021, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading