मुंबई, 20 मार्च : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) वाचण्याचा प्रयत्न करतं आहे. अशात आता गुगलनेही (google) या व्हायरसपासून बचावासाठी खास डुडल (doodle) तयार केलं आहे.
गुगलने या डुडलमधून हात नेमके कसे धुवावेत, हात धुण्याची योग्य पद्धत कोणती, हे या व्हिडीओतून दाखवलं आहे.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीही दाखवण्यात आली आहे, ही व्यक्ती आहे डॉ. इग्नाज सेमेल्विस (Dr. Ignaz Semmelweis). त्यांना हात धुण्याचे फायदे सांगणारी पहिली व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
हे वाचा - भारतात पाचव्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या 196 वर
डॉ. सेमेल्विस हंगेरीतल्या वियाना जनरल हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यावेळी यांनी पाहिलं की, गर्भवती महिला आणि नवजात बाळांचा अज्ञात आजारामुळे मृत्यू होतो आहे. त्यावेळी हात धुण्याची पद्धत नव्हती, अगदी डॉक्टरही हात धुत नव्हते आणि या मृत्यूमागे हेच कारण असावं हे त्यांनी ओळखलं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातल्या प्रत्येक डॉक्टरला हात धुण्याचा प्रस्ताव मांडला. डॉक्टरांनी हात धुतल्यानंतर माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालं होतं.
हे वाचा - रुग्णालयातून पळालेला कोरोना संशयित डॉक्टर बेशुद्ध, आता आहे व्हेंटिलेटरवर
आता कोरोनाव्हायरसमुळे सर्वांना हात धुण्याचा सल्ला दिला जातो आहे. त्यामुळे हात धुण्याच्या पद्धतीसह डॉ. सेमेल्विस यांचीही आठवण काढण्यात आली आहे.