क्वारंटाइन सेंटरमधून घरी जाणाऱ्यांसाठी प्रवाशांना देणार condom

क्वारंटाइन सेंटरमधून घरी जाणाऱ्यांसाठी प्रवाशांना देणार condom

कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य विभागाने हा पुढाकार घेतला आहे.

  • Share this:

पटना, 30 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. याच महासंकटात लॉकडाऊनमुळे पती-पत्नी एकमेकांच्या जवळ येणार आणि त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून क्वारंटाइन सेंटरमधून घरी परतणाऱ्या प्रवाशांना condom वाटण्यात येणार आहे. बिहार सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य विभागाने हा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत 14 दिवसांचा क्वारंटाइन काळ पूर्ण झाल्यानंतर परप्रांतीय मजुरांना कुटुंब नियोजनाची पद्धतही सांगण्यात येईल. त्यानंतर कंडोमचं वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यात असा उपक्रम सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. गोपाळगंज इथल्या डीपीएम धीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्यांना घरी जाण्याआधी कंडोमचं वाटप करण्यात येईल. क्वारंटाइन असलेल्यांसाठीच केवळ हे वाटण्यात येणार आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये जोडीदारासह होतायेत भांडणं; असं फुलवा पुन्हा प्रेम

नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार केअर इंडियाचे कुटुंब नियोजन समन्वयक अमित कुमार यांनी डोअर टू डोअर हेल्थ चेकअप करताना पोलिओ आणि कुटुंब नियोजनाची माहिती दिली. याशिवाय कुटुंब नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची खबरदारी घेण्याचं आवाहन ही करण्यात आलं.

कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे अनेक व्यवसाय, छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले. उदरनिर्वाह करणं कठीण झाल्यानं परप्रांतीय आपल्या मूळ गावी परतू लागले. या काळात मोठ्या शहरातून गावी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. गावी आलेल्यांना 14 दिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे त्यांनंतर घरी सोडलं जात आहे.

हे वाचा-कोरोनाच्या परिस्थितीत नवजात बाळाची अशी घ्या काळजी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 11:40 PM IST

ताज्या बातम्या