मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवयची असतील तर या 5 गोष्टी टाळा

फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवयची असतील तर या 5 गोष्टी टाळा

फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसंच काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसंच काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसंच काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मुंबई, 02 जानेवारी : फुफ्फुसं हा श्वसन संस्थेतला सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. कोरोना विषाणूची लागण आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसं कमकुवत होतात त्यामुळे धाप लागणे, दमछाक होणे अशी लक्षणं दिसतात. आपण नाकावाटे घेतलेला श्वासातील ऑक्सिजन फिल्टर करण्याचं काम फुफ्फुसं करतात. फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसंच काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण नकळतपणे काही असे पदार्थ खातो ज्यांच्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य बिघडू शकतं. आज आम्ही आपल्याला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या टाळल्यातर तुमची फुफ्फुसं चांगली राहतील.

दारू (Alcohol)

दारु पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतंच पण त्याचं प्रमाण अति झालं की फुफ्फुस कमकुवत होतात. अल्कोहोलमध्ये असलेल्या सल्फेटमुळे दमा होण्याची शक्यता असते. इथेनॉलमुळे फुफ्फुसांच्या केशवाहिन्या खराब होतात. अति प्रमाणात दारू प्यायल्याने न्यूमोनिया आणि त्यामुळे फुफ्फुसांचे इतर आजारही होऊ शकतात.

मीठ (Salt)

अन्नपदार्थांत मीठच नसेल तर तसे अळणी पदार्थ कुणीच खाणार नाही. मिठातून आयोडिन मिळतं त्यामुळे ते शरीरातील हाडांच्या वाढीसाठी फायद्याचं असतं अशा जाहिरातील आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. त्यामुळे मीठ हे आहारात असणं गरजेचं आहेच पण ते प्रमाणात. त्याचं प्रमाण जास्त झालं की फुफ्फुसांशी संबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळे फुफ्फुसं आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी कमी मीठ खा.

सॉफ्ट ड्रिंक (Soft Drink)

सॉफ्ट ड्रिंक पिणं सगळ्यांनाच आवडतं. प्रवासात तर त्याशिवाय चालतच नाही. अनेकांच्या घरातील फ्रीजमध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या असतात. पण हे ड्रिंक जास्त प्यायला तर फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकतं. गोड सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्या लोकांना फुफ्फुसांचा त्रास होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत अधिक असते.

हे वाचा-खूशखबर! UKमध्ये ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीला मंजुरी; आता भारताच्या निर्णयाकडे लक्ष

प्रोसेस्ड मांस (Processed Meat)

सध्या प्रोसेस केलेलं मांस खाण्याचं प्रमाण वाढत आहे. मांसाची मागणी वाढल्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ते ठेवलं जातं आणि नंतर ते खायला दिलं जातं. अशा मांसावर प्रक्रिया करताना आणि ते साठवताना नायट्राइड वापरलं जातं त्याच्या सेवनाने फुफ्फुसांना सूज येऊ शकते व त्यांच्यावर ताणही येऊ शकतो. प्रक्रिया केलेलं मांस फुफ्फुसांसाठी हानीकारक असतं.

तळलेले पदार्थ (Fried Food)

तळलेले आणि भाजलेले पदार्थ किंवा डीप फ्राय केलेले पदार्थ अनेकांना खूप आवडतात. पण असे पदार्थ तुम्हाला कितीही आवडत असतील तरीही ते प्रमाणात खायला हवेत. तळकट पदार्थांमुळे फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो आणि ती कमकुवत होऊ शकतात.

त्यामुळे जसं आरोग्य राखण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणं गरजेचं आहे तसंच अपायकारक पदार्थ टाळणंही गरजेचं आहे.

First published:
top videos

    Tags: Lifestyle